10

डिझेल किमतीत ९५ पैशांनी वाढ

पेट्रोल, डिझेलच्या किमतीत घट होत असताना आता डिझेलच्या दरात वाढ झाले. ९५ पैशांनी डिझेल महाग झालेच.

सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला झटका, न्यायाधीश नियुक्तीचा न्यायिक आयोग घटनाबाह्य

न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी न्यायिक आयोग घटनाबाह्य, असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेय. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी आत्तापर्यंत वापरली गेलेली ‘कॉलेजियम’ पद्धत रद्द केलेय. यामुळे केंद्र सरकारला मोठा झटका बसला आहे.

देशात राहायचे असेल तर गोमांस खाणे सोडून द्या : मनोहर लाल खट्टर

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी गोमांसबाबत वादग्रस्त विधान केलेय. मुस्लिमांना गोमांस खायचे असेल तर त्यांना देश सोडावा लागेल. जर गोमांस खाण्याचे सोडून दिले तर ते देशात राहू शकतात, असे खट्टर यांनी म्हटलेय.

'कॉल ड्रॉप झाल्यास एक रुपया भरपाई'

मोबाईल कंपन्यांचे फोनसाठी अनेकवेळा नेटवर्क नसते. ज्यावेळी असते त्यावेळी फोन सुरु असताना मध्येच फोन कॉल कट होतो. पुन्हा फोन लावावा लागतो. मात्र, कॉल ड्रॉप होतो, त्यावेळी पूर्ण पैसे कापले जातात. या भुर्दंड मात्र, ग्राहकाला बसतो. आता हा भुर्दंड भरपाईच्या स्वरुपात कंपन्यांना द्यावा लागणार आहे. त्यासाठी एक रुपया भरपाई द्यावी लागेल.

सोनिया-राहुल गांधी यांना दिल्ली हायकोर्टाचा दणका

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधी यांना दिल्ली हायकोर्टानं दणका दिला आहे.

डान्स बारवरील बंदी उठवली, पुन्हा छमछम सुरु होणार

राष्ट्रवादीचे नेते दिवंगत आर आर पाटील यांनी पुढाकार घेऊन मुंबईतील डान्सबार बंद केले होते. त्यावर बराच वादंग झाला. मात्र, आर आर आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने मुंबईतील डान्सबार बंद ठेवण्यात आले. मात्र, या डान्सबारवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे.त्यामुळे मुंबईत पुन्हा डान्सबार  सुरु होण्याचा मार्ग मोकळा झालाय.

नॅशनल हेराल्ड खटला : जज बदलण्याची सोनिया, राहुल गांधी यांची मागणी

काँग्रेस आणि गांधी कुटुंबीयांसाठी डोकेदुखी ठरलेल्या नॅशनल हेराल्ड खटल्याप्रकरणी महत्त्वाची सुनावणी होणार आहे. काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि गांधी कुटुंबीयांशी संबधित व्यक्ती या प्रकरणात अडकल्यात. या खटल्याच्या सुनावणीआधी जज बदली करण्याची मागणी सोनिया आणि राहुल गांधींकडून करण्यात आलीय.

देशात समान नागरी कायदा हवा : भाजप

देशात समान नागरी कायदा लागू करणं ही काळाची गरज आहे असं मत केंद्रीय कायदा मंत्री सदानंद गौडा यांनी व्यक्त केलंय.

टीम इंडिया-दक्षिण आफ्रिकेत इंदौरमध्ये आज रंगणार दुसरी वन-डे

इंदौरमध्ये आज रंगणार दुसरी वन-डे होत आहे. टीम इंडियासमोर कमबॅकचं आव्हान आहेच. तर विजयी लय कायम राखण्यासाठी आफ्रिका सज्ज आहे. त्यामुळे या वन-डेकडे लक्ष लागले आहे.

सानिया-मार्टिनाची घौडदौड कायम, चानया ओपन जिंकली

सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या जोडीने पुन्हा एकदा कमाल करुन दाखवली आहे. महिला दुहेरीत चायना ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकाविले.