10

हो, मी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे

न्यूयॉर्क - अमेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही शो 'टू अँड ए हाफ मॅन' मधील प्रसिद्ध अभिनेता चार्ली शीनने एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचा खुलासा केलाय.

चार वर्षापूर्वीच एड्स झाल्याचे समजले होते असे शीनने म्हटले आहे. ज्यांना शीनच्या आजाराबद्दल माहिती आहे त्या लोकांनी त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केल्यानंतर शीनने ही माहिती सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला. 

पॅरिसनंतर नायजेरियाच्या योलामध्ये दहशतवादी हल्ला

पूर्व नायजेरियाच्या योलामध्ये लोकांच्या गर्दीत एक बॉम्बस्फोट झाला आणि ३० हून अधिक जणांचा मृत्यू झालाय. 

भारताला आता कुणाची मेहेबानी नको तर बरोबरीचं स्थान हवं : नरेंद्र मोदी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या दौऱ्यादरम्यान दुसऱ्याच दिवशी लंडनमधील वेम्बले स्टेडियमवर ६० हजार भारतीय समुदायासमोर भाषण केले. यावेळी बोलताना, भारताला आता कुणाची मेहेबानी नको तर बरोबरीचं स्थान हवं अशा रोखठोक शब्दांत ठणकावत त्यांनी लंडनचं मैदान मारलं.

असहिष्णुतेबाबत नरेंद्र मोदींच्या भूमिकेची खिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असहिष्णूदेबाबत ब्रिटनमध्ये केलेल्या खुलाशाबाबत विरोधकांनी टिकेचा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे. भारत ही बुद्ध आणि गांधी यांची भूमी आहे याचा भारतात आल्यावर पंतप्रधान मोदींना विसर पडतो का, असा सवाल काँग्रेस नेते आनंद शर्मां यांनी उपस्थित केला.

रेल्वेचे तिकिट कॅन्सल दर दुप्पट, नवे नियम लागू

रेल्वेने आपला गल्ला जमविण्यासाठी छुपा अजेंडा लागू केलाय. त्यामुळे आता रेल्वेचे तिकिट रद्द करावयाचे असेल तर तुम्हाला दुप्पट पैसे द्यावे लागतील. त्यामुळे तिकिटाची रक्कम आपल्या हातात तोकडीच पडेल. त्यामुळे प्रवास करण्याचे पक्के झाले तर तिकिट काढा आणि पैसे वाचवा.

पाकिस्तानचा हिरवा कंदील, चीनचा अरबी समुद्रात प्रवेश

पाकिस्तान आणि चीनने गुरुवारी अत्यंत महत्त्वकांक्षी चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरीडोरवर शिक्कामोर्तब केलंय. या करारानुसार पाकिस्तानने बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर बंदराच्या परिसरातील सुमारे दोन हजार एकर जमीन ४३ वर्षांसाठी चीनला भाडेतत्वावर दिली आहे. त्यामुळे चीनची अरबी समुद्रातील घुसखोरी वाढणार आहे.

दिवाळीत भारताचा अद्भूत नजराणा, नासा प्रसिद्ध केले अनोखे छायाचित्र

दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळते. काही फटाक्यांमुळे आकाशात विविध रंगसंगती पाहायला मिळते. मात्र, आपल्या भारत मातेचा रंगबिरंगी फोटो पाहायला किती मजा येईल. नासाने उपग्रहाच्या माध्यमातून भारताचा एक फोटो घेतलाय. दिवाळीत भारत कसा दिसतो, याचे दर्शन या फोटोतून पाहायला मिळते.

'हिंदूंवर कोणी अत्याचार केले तर मुस्लिमांवर कारवाई'

पाकिस्तानातील हिंदू अल्पसंख्याक समुदायावर वाढत्या अत्याचाराबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मानवी अधिकारांचे उल्लंघन करण्यात आल्याने पंतप्रधान नवाझ शरीफ यांना कारवाई करण्याचा इशारा द्यावा लागला. तो कोणीही असो. जरी मुस्लिम समुदायातील असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल, शरीफ म्हणालेत.

म्यानमारमध्ये आँग सॅन सू की यांच्या पक्षाची बाजी

म्यानमार देशात रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकशाहीवादी नेत्या आँग सॅन सू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी पक्षाने बाजी मारली आहे. त्यानंतर लष्कर समर्थित विद्यमान सरकारने शांततेने सत्ता हस्तांतरण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या देशात सू की यांचे सरकार येणे ही अटळ बाब ठरली आहे.

अभिनेता शाहरुख खानला दणका, तीन तास चौकशी

किंग खान शाहरुख खानची ईडीकडून चौकशी करण्यात आली. ईडीकडून तब्बल तीन तास शाहरुखची चौकशी करण्यात आली. फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली.