10

पोखरणला फायरिंग रेंजमध्ये दुर्घटना, मेजर ध्रुव यादव शहीद

पोखरण फायरिंग रेंजमध्ये मंगळवारी एक दुर्घटना घडली. या दुर्घटनेत भारतीय सैन्याचे मेजर ध्रुव यादव शहीद झाले आहेत. सांगण्यात येतंय की, टँक फायरिंग दरम्यान अपघातानं एका बॉम्बचा स्फोट झाल्यानं मेजर ध्रुव यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची 'कोर्ट ऑफ इनक्वायरी'चे आदेश दिले गेलेत.

रेल्वेने तिकीट बुकिंग वेळेत पुन्हा केला बदल

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. ऑनलाईन टिकीट बुकींगच्या वेळेत पुन्हा एकदा बदल केला आहे. हा बदल करताना १५ मिनिटांची वाढ केली आहे. रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.

हार्दिक पटेल आणि आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

गुजरातमधील पाटीदार समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत आंदोलन छेडणाऱ्या हार्दिक पटेल यांना आणि आंदोलन करणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना सूरत पोलिसांनी ताब्यात घेतले. आज समता रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, ती काढण्याआधीच  पोलिसांनी त्यांना उचलले.

अशा मंत्र्याला मोदींनी लाथ मारुन बाहेर काढावे : ओवेसी

केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांच्या वादग्रस्त विधानानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी खूपच संतापलेत. त्यांनी या विधानावर आक्षेप घेतला. अशा मंत्र्यांना मोदींनी लाथ मारुन बाहेर काढले पाहिजे, असे म्हटले.

आता वेळ बुक करून घ्या शिर्डीत साईबाबांचं दर्शन!

श्री साईबाबा संस्थान ट्रस्टने (एसएसएसटी) आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर आणि जम्मू-काश्मीरच्या वैष्णोदेवी मंदिराच्या धर्तीवर आता 'वेळ दर्शन' सेवा सुरू करण्याचा विचार केलाय. या सेवेद्वारे आपण दर्शनाची वेळ बुक करून त्यावेळेत साईबाबांचं दर्शन घेऊ शकाल.

नेताजींच्या मृत्यूचं गूढ उलगडणार? मृत्यूबाबतच्या 64 फाईल्स सार्वजनिक

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याशी निगडित 64 फाईल्स आज कोलकातामध्ये सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगाल सरकारनं नेताजी यांच्याबाबतच्या 64 फाईल्स कोलकाता पोलीस म्यूझियममध्ये जनतेसाठी खुल्या केल्या आहेत.  

पाकिस्तानात पेशावर येथे दहशतवादी हल्ला

पाकिस्तानील पेशावर येथील हवाई लष्कराच्या विमानतळावर आज सकाळी १० अतिरेक्यांनी जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्याताला प्रत्युत्तर देताना लष्कराने ६ दहशतवादी ठार केले. तर ४ जण अजूनही गोळीबार करत आहेत.

बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया रुग्णालयात

 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांना तातडीने रात्री रुग्णालयात दाखल करण्यात  आले आहे. रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने कुटुंबीयांनी त्यांना बी. एम. बिर्ला हार्ट रिसर्च सेंटरमध्ये दाखल आले. 

मांसबंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप करण्यास नकार

मुंबईमध्ये मांसबंदी विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय. जैन समाजाने पर्यूषण काळात मांस विक्री करण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती.

व्होडाफोनने सुरु केली ‘ऑल इन वन’ रोमिंग सुविधा

दूरसंचार कंपनी व्होडाफोन इंडियाने खासकरून दिल्ली आणि एनसीआर सर्कलमधील आपल्या प्रिपेड ग्राहाकांसाठी 'ऑल इन वन' रोमिंग पॅक उपलब्ध केला आहे. याता एकदाच रिचार्ज केल्यानंतर लोकल टॉकटाईम, एसटीडी, इन्कमिंग आणि आऊटगोईंग मिनट असणार आहे.