10

मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, केजरीवाल यांनी केली हकालपट्टी

दिल्लीत 'आप'चे सरकार आहे. भ्रष्टाचाराला पाठिशी घालणार नाही, असे सांगून सत्ते आले. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने दिल्लीच्या पर्यावरण आणि अन्नपुरवठा मंत्री असीम अहमद खान यांची शुक्रवारी मंत्रीपदावरून हकालपट्टी केली. 

नरेंद्र मोदी हे ब्रह्मपिशाच्च आहेत, त्यांना पळवून लावा : लालूप्रसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना निशाणा साधला. मी सैतान असलो तर, ते ब्रम्हपिशाच्च आहेत, असा लालूप्रसाद यांनी मोदींवर पलटवार केलाय.

टीम इंडियाने खाल्ली माती, स्थान घसरले

भारताला दक्षिण आफ्रिकेबरोबर दोन टी-२० सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने दोन स्थानाने टीम इंडियाचा नंबर खाली गेलाय. त्यामुळे भारत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

'आधार कार्ड'ची व्याप्ती वाढवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

'आधार कार्ड'बाबत अद्याप ठोस निर्णय होत नाही. त्यामुळे 'आधार कार्ड'बाबत संभ्रम कायम आहे. दरम्यान, 'आधार' सक्तीचे नाही, असा कोर्टाने याआधीच निर्णय दिलाय. आता 'आधार कार्ड'ची व्याप्ती वाढवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय.

रेल्वेच्या १२ लाख कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस

सणासूदीच्या दिवसात रेल्वेच्या जवळपास १२ लाख कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मंजूर करण्यात आलाय. 

मी पुन्हा क्रिकेट खेळणार : सचिन तेंडुलकर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा क्रिकेटच्या मैदानात खेळताना दिसणार आहे. सचिनने याबाबत अधिकृतपणे सांगितलेय. त्याने ट्विट केलेय. मी पुन्हा क्रिकेट खेळणार आहे. 

तेव्हा भारत पाकिस्तानवर हल्ला करणार होता? पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांचा दावा

पाकिस्तानचे माजी विदेश मंत्री खुर्शीद महमूद कसूरी यांना दावा केलाय की, अमेरिकेचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार राहिलेले जॉन मॅक्केन यांच्या नेतृत्वात अमेरिकन प्रतिनिधी मंडळानं मुंबई हल्ल्यानंतर त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी भारत लाहोर जवळील मुर्दिके इथं असलेल्या जमात-उद-दावा आणि लष्कर-ए-तोयबाच्या मुख्यालयावर 'सर्जिकल' हवाई हल्ला करणार होता.

आकाशात विमान उडवतांनाच पायलटचा मृत्यू

 बोस्टन जाणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात पायलटची तब्येत अचानक बिघडली आणि विमानातच त्यांचा मृत्यू झाला. विमान चालवतांनाच पायलटचा मृत्यू झाल्यानंतर सहाय्यक पायलटनं अर्ध्या रस्त्यातून विमान परत न्यूयॉर्कला आणलं.

बंगळुरूत २२ वर्षीय कॉल सेंटरमधील महिला कर्मचाऱ्यावर गँगरेप

 गँगरेपच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. यात आणखी एका धक्कादायक घटनेची भर पडली. बंगळुरूत कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलीय. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून ते त्या नराधमांचा शोध घेत आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत १ दहशतवादी ठार, ४ जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील कूपवाडा परिसरात दहशतवादी आणि लष्कराचे जवान यांच्यात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश मिळालंय. मात्र चकमकीत ४ जवान शहीद झाले आहेत. कूपवाडा इथल्या लोलबाच्या घनदाट जंगलात काल रात्रीपासून ही धुमश्चक्री सुरू आहे.