डान्स बारवरील बंदी उठवली, पुन्हा छमछम सुरु होणार

राष्ट्रवादीचे नेते दिवंगत आर आर पाटील यांनी पुढाकार घेऊन मुंबईतील डान्सबार बंद केले होते. त्यावर बराच वादंग झाला. मात्र, आर आर आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने मुंबईतील डान्सबार बंद ठेवण्यात आले. मात्र, या डान्सबारवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे.त्यामुळे मुंबईत पुन्हा डान्सबार  सुरु होण्याचा मार्ग मोकळा झालाय.

PTI | Updated: Oct 15, 2015, 01:20 PM IST
डान्स बारवरील बंदी उठवली, पुन्हा छमछम सुरु होणार title=

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे नेते दिवंगत आर आर पाटील यांनी पुढाकार घेऊन मुंबईतील डान्सबार बंद केले होते. त्यावर बराच वादंग झाला. मात्र, आर आर आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने मुंबईतील डान्सबार बंद ठेवण्यात आले. मात्र, या डान्सबारवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे.त्यामुळे राज्यासह मुंबईत पुन्हा डान्सबार  सुरु होण्याचा मार्ग मोकळा झालाय.

मुंबईतील डान्स बारवली बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली. त्यामुळे डान्स बार मालकांच्या लढ्याला यश आलेय. त्यामुळे बारबालांच्या रोजगारीचा जो प्रश्न ऐरणीवर आला होता. तो आता निकालात निघण्याची शक्यता आहे. बार सुरु होणार असल्याने पुन्हा बारबालांना काम मिळण्याचा मार्ग दूर झालाय.

डान्सबारवर बंदी घालणाऱ्या राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दणका देत या बंदीच्या निर्णयाला स्थगिती दिली. राज्यात डान्स बार चालवण्याची परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता राज्यातील बारमध्ये पुन्हा  'छमछम' सुरु होणार आहे.

तत्कालीन गृहमंत्री आरआरयांनी डान्सबारवर बंदी टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यामुळे ७५ हजार बारबाला बेकार झाल्याचा दावा करत बार अँड हॉटेल असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयाने धाव घेतली होती. २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी हटवली होती. मात्र त्यानंतर २०१४ मध्ये राज्य सरकारने सुधारित विधेयक आणून डान्सबारवर बंदी टाकली होती. सर्वोच्च न्यायालयाने डान्सबार बंदीच्या निर्णयाला स्थगिती दिली. परवाना देणारी सरकारी यंत्रणा बारमधील आक्षेपार्ह नृत्यांवर निर्बंध आणू शकते असेही कोर्टाने स्पष्ट केले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.