प्रशिक्षकासह 60 जण 2 वर्षांपासून करत होते अल्पवयीन खेळाडूचे लैंगिक शोषण, कसे उघड झाले रहस्य?

Kerala Crime News: 16 वर्षीय खेळाडूवर त्याच्या प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांनी 2 वर्षांहून अधिक काळ लैंगिक शोषण केलं. याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे.  

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 11, 2025, 11:22 AM IST
प्रशिक्षकासह 60 जण 2 वर्षांपासून करत होते अल्पवयीन खेळाडूचे लैंगिक शोषण, कसे उघड झाले रहस्य? title=

Crime News: केरळमध्ये अल्पवयीन मुलीचे  लैंगिक शोषण झाल्याची वेदनादायक बातमी समोर आली आहे.  केरळ पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की त्यांनी या प्रकरणी चार एफआयआर नोंदवले आहेत. याशिवाय दोन वर्षांच्या कालावधीत पाथनमथिट्टा येथे एका मुलीवर अनेक वेळा लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. या प्रकरणात 60 हून अधिक लोकांचा सहभाग असल्याचा संशय आहे. वृत्तसंस्थेने शुक्रवारी पोलिसांच्या हवाल्याने सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी 18 वर्षांची झालेल्या या मुलीने तिच्यावर वयाच्या 16 वर्षापासून तिच्यावर अनेकदा लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.

समुपदेशनादरम्यान समोर आली घटना 

बाल कल्याण समितीने आयोजित केलेल्या एका समुपदेशनादरम्यान ही बाब उघडकीस आली. या समुपदेशनादरम्यान एका शैक्षणिक संस्थेतील मुलीच्या शिक्षकांनी तिच्या वागणुकीतील लक्षणीय बदलांबद्दल समितीला माहिती दिली. आता केरळ पोलिसांनी पोलिसांनी दाखल केलेल्या दोन एफआयआरच्या संदर्भात पाच जणांना अटक करण्यात आली आहे, तर आणखी एक व्यक्ती आधीच वेगळ्या प्रकरणासाठी तुरुंगात शिक्षा भोगत आहे. 

हे ही वाचा: Hindu Ritual: महिलांनी नारळ का फोडू नये? याचे कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल

 

कॅम्पमध्ये करायचे दुष्कर्म   

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पाथनमथिट्टा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष राजीव एन यांच्या म्हणण्यानुसार, अल्पवयीन मुलीने शाळेतील समुपदेशन सत्रात लैंगिक शोषणाबद्दल पहिल्यांदा सांगितले. त्यानंतर बाल कल्याण समितीच्या हस्तक्षेपानंतर पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला. केरळमधील पथनामथिट्टा येथे क्रीडा शिबिरांसह, प्रशिक्षक, वर्गमित्र आणि स्थानिक रहिवाशांनी अशा प्रकारचे कृत्य केल्याचा आरोप या खेळाडू मुलीने केला आहे.

हे ही वाचा: Maha Kumbh 2025: कोण असतात 'तंगटोडा साधू'? ज्याची मुलाखत IAS पेक्षाही असते अवघड, जाणून घ्या प्रोसेस

 

बालकल्याण समितीने दिली पोलिसांना माहिती 

बाल कल्याण समितीच्या सदस्यांनी आरोप खरे असल्याची खात्री करण्यासाठी मुलीला समुपदेशनासाठी मानसशास्त्रज्ञाकडे नेले. बाल कल्याण समितीचे अध्यक्ष म्हणाले की, प्रकरण 'असामान्य' असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

हे ही वाचा: Maha Kumbh 2025: नागा साधूंना थंडी का लागत नाही? जाणून घ्या मनोरंजक उत्तर

 

POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

पोलिसांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे की मुलीकडे स्वतःचा फोन नाही आणि तिने तिच्या वडिलांचा मोबाईल वापरून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या सुमारे 40 लोकांचे नंबर सेव्ह केले आहेत. या प्रकरणी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायदा आणि फौजदारी कायद्याच्या इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.