10

आंध्र प्रदेशची नवी राजधानी अमरावती, पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमीपूजन

आंध्रप्रदेशची नवी राजधानी अमरावतीचे भूमीपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

महात्मा गांधींच्या पणतीवर आफ्रिकेत फसवणुकीचा आरोप

महात्मा गांधींच्या पणतीवर दक्षिण आफ्रिकेत फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. ४५ वर्षीय आशीष लता यांनी दक्षिण आफ्रिकेतील दोन व्यापा-यांना ८ लाख ३० हजार डॉलर्सना फसवल्याचा आरोप करण्यात आलाय.

उबेर टॅक्‍सी बलात्कारप्रकरणातील चालक शिवकुमार यादव दोषी

उबेर टॅक्‍सी बलात्कारप्रकरणातील आरोपी चालक शिवकुमार यादव याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्याला २३ ऑक्टोबरला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

पाकिस्ताने खेळाडू अख्तर, अक्रम, पंच अलीम यांची माघार

क्रिकेट खेळात कोणीही राजकारण आणू नये, अस सल्ला देण्यात येतो. मात्र, क्रिकेटच्या मैदानात राजकीय आखाडात दिसून येत आहे. पाकिस्तानमधून वाढत्या भारतविरोधी कारवाया याला शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे पाकिस्तान कलाकार, खेळाडू यांना विरोध शिवसेनेकडून होत आहे. त्यामुळे वसिम अक्रम आणि शोएब अख्तरने कॉमेंट्रीला नकार दिलाय.

निवृत्तीबाबत वृत्ताचा इन्कार, देशात परतल्यानंतर बोलेन : वीरेंद्र सेहवाग

टीम इंडियाचा आघाडीचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिल्याचे वृत्त प्रसिद्ध होतात सेहवागने याचा इन्कार केला. मला जे काही बोलायचे आहे ती मी भारतात परतल्यानंतरच बोलेन, असे त्याने म्हटलेय.

देशातील सहिष्णुतेबाबत राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता

देशात सहिष्णुता आणि मतांतर मान्य करणे यांचा ऱ्हास सुरु झाला आहे काय याबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे. सहिष्णुतेच्या गुणामुळेच भारतीय संस्कृती ५ हजार वर्षे टिकली आहे. तिने नेहमीच मतांतरे आणि मतभेद मान्य केलेत.

भारत-दक्षिण आफ्रिका वन-डे होऊ देणार नाही : हार्दिक पटेल

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वन-डे सामना राजकोट येथे होत आहे. मात्र, या सामन्याची तिकिटे पाटीदार समाजातील लोकांना दिली गेली नाहीत, असा दावा पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी केलाय. त्यामुळे हा सामना होऊ देणार नाही, असा गर्भीत इशारा दिलाय.

दिल्लीत दोन चिमुरडींवर सामूहिक बलात्कार

 दिल्ली पुन्हा हादरली आहे. दोन बालिकांवर बलात्कार करण्याच्या घटना घडल्यात. राजधानी दिल्लीत २ वर्षांच्या चिमुरडीचे रामलीला कार्यक्रमादरम्यान अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडलेय. तर दुसरीकडे बर्थ डे पार्टीसाठी तरूणीवर सहा जणांनी बलात्कार केला. 

व्यापम घोटाळा : केंद्रीय निरीक्षकांचा संशयास्पद मृत्यू, ओडिशातील रेल्वे ट्रॅकवर मृतदेह

भाजपचे सरकार असलेल्या मध्य प्रदेशात व्यापम घोटाळा उघड झाला. मात्र, या घोटाळ्यातील संशय अधिक गडद होत आहे. व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) गैरव्यवहार प्रकरणात आता आणखी एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आलेय.

पीएफचे पैसे ऑनलाईन काढता येणार

आता प्रत्येकाला आपला प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफचे ऑनलाईन पैसे काढता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार नाही.