10

ऑनलाइन तिकिट बुकींग करणाऱ्यांसाठी ही बातमी जरुरीची

धर्मशाळा येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० क्रिकेट सामना होणार आहे. यासाठी ऑनलाईन तिकिट बुकींग करणाऱ्या प्रेक्षकांना आपले तिकीट काऊंटरवरुन घ्यावे लागणार आहे. याच बुकींगच्या स्लिपच्या आधारे स्टेडिअममध्ये प्रवेश मिळणार आहे.

सोने दरात तिसऱ्या दिवशी घसरण

परदेशातील मंदी आणि ग्राहकांची मागणी कमी असल्याने देशाच्या राजधानी सराफा बाजारात सोने दर सलग तिसऱ्या दिवशी घसरलेला पाहायला मिळाला. सोने दरात २३५ रुपयांची घसरण पाहायला मिळाली. सोने प्रति तोळा २६,५७५ रुपये दर होता.

मुंबई सेंट्रल टर्मिनसवर गूगलमार्फत मोफत वायफाय सेवा?

भारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रवाशांना मोफत वायफाय सुविधा देण्याचा मानस व्यक्त करण्यात आलाय. गूगलमार्फत मुंबईत ही सेवा देण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई सेंट्रल टर्मिनसवर प्रथम सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी), लोकमान्य टिळक टर्निनस (एलटीटी) या स्टेशनवर वायफाय सुविधा असेल.

मास्टर ब्लास्टर सचिनच्या आवाजात स्वच्छ भारत अभियानाचं अँथम!

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आपल्याला आता गातांना दिसणार आहे. सचिननं नुकतंच स्वच्छ भारत अभियानाचं अँथम रेकॉर्ड केलं. सचिन आज ट्विटरवरून ही माहिती दिलीय. स्वच्छ भारत अभियानासाठी आपली आणखी एक मदत असल्याचं त्यानं सांगितलं.

भाजपची पैसे घेऊन उमेदवारी : भाजप खासदार

भाजपमध्ये गुन्हेगारांना पैसे घेऊन उमेदवारी दिली आहे, असा खळबळजनक आरोप भाजपचे खासदार आर. के. सिंग यांनी केलाय. त्यामुळे भाजपमध्ये पैशाचा बाजार होत असल्याचे यानिमित्ताने पुढे आल्याची चर्चा आहे.

सानिया-मार्टिना ग्वाँग्झू ओपन टेनिसच्या फायनलमध्ये

भारताची सानिया मिर्झा आणि स्विर्झलंडची जोडीदार मार्टिना हिंगिस यांनी ग्वाँग्झू ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे आणखी एक पदक मिळण्यासाठी ती सज्ज झालेय.

संयुक्त राष्ट्रात बदल आवश्यक : नरेंद्र मोदी

विकास हवा असेल तर जगातील गरीबी संपवली पाहिजे. तसेच विश्वसनियता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघात बदल करणे गरजेचे आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. मोदी यांनी यूएनमध्ये भाषण करताना हे मत व्यक्त केले.

निवड समितीने आणले मेरी कोमचा डोळ्यात पाणी

कांस्यपदक विजेती बॉक्सर मेरी कोम निवड समितीसमोर ढसाढसा रडली. ज्यावेळी ऑलिंपिक पदक जिंकल्यानंतर भारतात परतलेली मेरी कोम अत्यंत भाऊक झाल्याचे आपण पाहिले होते. सर्वांनी तिचे स्वागत केले आणि हे प्रेम पाहून ती भारावली होती. मात्र, त्याच मेरी कोमला निवड समितीसमोर रडावे लागले.

भारतात गुंतवणुकीला दारे खुली, सुधारणांना सर्वोच्च प्राधान्य : नरेंद्र मोदी

भारतात प्रशासकीय सुधारणांना आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असे सांगत तुम्ही गुंतवणूक करा. त्यासाठी अत्यंत सुलभ आणि सुटसुटीत मंजुरीची प्रक्रिया असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फॉर्च्युन ५००’ कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांना आश्वासन दिले.

Video: बांग्लादेशमधील सेक्स, गुलामगिरी आणि ड्रग्ज

बांग्लादेशात वेश्याव्यवसाय कायदेशीर आहे. हे एक मुस्लीम राष्ट्र आहे. देशातील सर्वात मोठा कुंटणखाना येथे चालतो. १५०० महिला आणि मुली शरीर विक्री करतात. येथे गरीबी मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. सेक्स, गरीबी आणि ड्रग्ज असेच येथील बांग्लादेशी कुंटणखानासंदर्भात दिसतेय.