10

विना अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ

तेल कंपन्यांनी व्यावसायिक आणि सब्सिडी नसलेल्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ केलीय. कमर्शियल सिलेंजरच्या किमतीत ५० रुपये आणि सब्सिडी नसलेल्या घरगुती सिलेंडरच्या किमतीत २७.५० रुपयांनी वाढ झालीय.

असहिष्णूताबाबत काँग्रेसने आम्हाला शिकवू नये : मोदी

देशात असहिष्णूतेची भावना निर्माण झाल्याचे आरोप  होत आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी साहित्यिक, चित्रपटकर्मी, शास्त्रज्ञ यांनी आपले पुरस्कार परत केलेत. तसेच काँग्रेस आणि कम्युनिष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवलेय. याला आज मोदी यांची प्रत्युत्तर दिलेय. असहिष्णूताबाबत काँग्रेसने आम्हाला शिकवू नये, असे मोदी म्हणालेत.

नेपाळ भारत सीमेवरील गोळीबारात भारतीयाचा मृत्यू; भारताकडून चिंता

भारत - नेपाळ सीमेवर तणाव निर्माण झालाय. नेपाळमधील भारतीय सीमारेषेपासून जवळ असलेल्या बिरगुंज शहरामधील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. या घटनेबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त केलेय.

बिहारमध्ये चौथ्या टप्प्यात ५७.५९ टक्के मतदान, निकाल ८ नोव्हेंबरला

बिहार विधानसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान संपले असून चौथ्या टप्प्यात तब्बल ५७.५९ टक्के मतदान झाले.

लादेनला ठार मारल्यानंतर रात्रभर झोपल्या नाहीत सोनिया गांधी : नक्वी

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर जोरदार टीका करताना भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले, दहशतवादी ओसामा बिन लादेन याला मारले गेले, त्यावेळी सोनिया रात्रभर रडत होत्या. त्यांना झोपच लागली नाही.

बिहारमध्ये चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरूवात

बिहारमध्ये विधानसभेच्या ५५ जागांसाठी रविवारी आज चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. भाजप आणि संयुक्त जनता दलाला निवडणुकीच्या या टप्प्यात बरीच अपेक्षा आहे. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांची युती होती आणि त्यांनी याअंतर्गत येणाऱ्या बहुतांश जागांवर विजय संपादन केला होता.

लवकरच भारतीय बाजारात मॅगी परतणार, उत्पादन सुरू

भारतात मॅगी उत्पादनाला सुरुवात करण्यात आलीय. मॅगीच्या उत्पादनासाठी भारतातील तीन प्रकल्प सोमवारपासून पुन्हा सुरु करण्यात आलेत.

प्रसिद्ध बंगाली अभिनेता पियुष गांगुलीचं निधन

बंगाली चित्रपट, टिव्ही आणि नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या पियुष गांगुलीचं निधन झालंय. मागील आठवड्यात झालेल्या भीषण अपघातानंतर त्यांच्यावर सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. 

भाजपच्या बोलबच्चन मंत्री, नेत्यांची राजनाथ सिंग यांनी केली कान उघडणी

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी तोंडाची बडबड करत वादग्रस्त व्यक्त करणाऱ्याा मंत्र्यांची चांगलीच खरडपट्टी काढलेय. त्यांनी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांची कान उघाडणी केली. 

दलितकांड : कुत्र्याला दगड मारल्यास सरकारचा काय संबंध : व्ही. के. सिंग

केंद्रातील मोदी सरकारमधील मंत्री व्ही. के. सिंग यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डोकेदुखी वाढविली आहे. हरियाणातील घटनेबाबत वादग्रस्त विधान केलेय. येथील घटनेचा संबंध कुत्र्याशी लावला आहे.