सोनिया-राहुल गांधी यांना दिल्ली हायकोर्टाचा दणका

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधी यांना दिल्ली हायकोर्टानं दणका दिला आहे.

PTI | Updated: Oct 15, 2015, 04:46 PM IST
सोनिया-राहुल गांधी यांना दिल्ली हायकोर्टाचा दणका title=

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधी यांना दिल्ली हायकोर्टानं दणका दिला आहे.

खटल्याची सुनावणी सुरू असताना न्यायाधीश बदलला जाण्यास त्यांनी अर्जाद्वारे आक्षेप घेतला होता. त्यावर आज झालेल्या सुनावणीवेळी या अर्जात कोणतंही तत्थ्य नसल्याचं मत कोर्टानं नोंदवलं.

न्या. सुनील गौर यांनी ८ महिने सुनावणी घेतल्यानंतर हे प्रकरण न्या. पी.एस. तेजी यांच्या न्यायालयात वर्ग करण्यात आलंय. याला गांधी कुटुंबानं विरोध केला आहे. गांधींचे वकील कपिल सिब्बल यांनीही कोर्टाचं म्हणणं योग्य असल्याचं मान्य केलं. त्यानंतर दुपारी आडीच नंतर या प्रकरणाची पुढली सुनावणी घेण्यात येईल, असं न्या. गौर यांनी जाहीर केलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.