10
10
सुनंदा पुष्कर गूढ मृत्यूप्रकरणी एफबीआयचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे. सुनंदा यांच्या शरीरात पोलोनियम या विषाचा समावेश नसल्याचं या रिपोर्टमधून समोर येत आहे. एफबीआयनं हा रिपोर्ट दिल्ली पोलिसांकडे पाठवलाय.
युनायटेन लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम अर्थात उल्फा या संघटनेचा प्रमुख अनुप चेतियाला बांग्लादेशनं भारताच्या स्वाधीन केले आहे. चेतियाला 1997 साली बांग्लादेशमध्ये अटक करण्यात आली होती.
पाँडेचरीच्या समुद्रकिनाऱ्या नजिक कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्यामुळं आज दिवसभरात पाँडेचरी तसंच चेन्नई आणि लगतच्या पट्ट्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. यावेळी वादळाचा अंदाजही वेधशाळेनं वर्तवलाय. त्यामुळे मच्छिमारांनी शक्यतो समुद्रात जाणं टाळावं असा इशाराही देण्यात आलाय.
केरळ राज्य डाव्यांचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, त्यांच्या किल्ल्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. केरळमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्षाने चांगली कामगिरी केलेय.
डॉन छोटा राजनला भारतात आणण्यासाठी बाली विमानतळावर आणले आहे. आज रात्रीपर्यंत भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे. ज्वालामुखीमुळे खंडित झालेली विमानसेवा सुरळीत झालेय. दरम्यान, राजनला भारतीय इंटरपोलच्या हवाली केले जाणार आहे.
बिहारमध्ये अखेरच्या टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदानाची नोंद होण्याची शक्यता आहे. दुपारी ४ पर्यंत ५६ टक्के मतदारांनी हक्क बजावला. अखेरच्या तासात वेग वाढण्याची शक्यता होती.
मोहालीत चार कसोटी क्रिकेट सामना मालिका सुरु होण्याच्या आधी भारतीय टीमचा कर्णधार विराटवर कोहली वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षा पडला. टीम इंडियातील सर्व सदस्यांनी विराटला २७ व्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.
कल्याणमधील कोंडी फोडण्यासाठी भाजपने शिवसेनेला नवा फॉर्मुला दिला आहे. कल्याणमधील महापौरपद रोटेशनमध्ये विभागून द्यावे असा प्रस्ताव भाजपकडून शिवसेना दिला गेल्याची माहिती भाजपच्या एका नेत्याने पीटीआयशी बोलताना सांगितले.
सार्वजनिक क्षेत्रात विमान कंपनी एअर इंडियानं आपल्या घरगुती नेटवर्कवर १७७७ रुपयांपासून सुरूवात अशा तिकीट विक्रीची घोषणा केलीय. कंपनीची ही 'दिवाळी धमाका' योजना ७ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील.
देशात असहिष्णूतेचे वातावरण निर्माण झालेय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने असहिष्णूता पसरवण्यात येत आहे. यातून समाजा समाजामध्ये फूट पाडण्यात येतेत, असा आरोप काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला आहे.