10

मी गोमांस खातो, ती माता नाही फक्त एक प्राणी आहे - काटजू

दिल्लीजवळ ग्रेटर नोएडाच्या दादरीमध्ये गोमांस खान्याच्या अफवेवरून अखलाक नावाच्या ५० वर्षीय व्यक्तीची मारून-मारून हत्या करण्यात आली. ही घटना राजकारणाशी प्रेरित असून, गाय माता नाही फक्त प्राणी असल्याचं माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी म्हटलंय.

दादरी दुर्घटना : अरविंद केजरीवाल यांना रोखलं, मोदींचे मौन का?

दादरी येथील दुर्घटनेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घटनास्थळी जाण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे केजरीवाल यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. दरम्यान, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. याप्रकणी मोदींनी मौन का धारण केलेय?

सानिया - मार्टिनाने वुहान ओपन महिला किताब जिंकला

जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या दुकलीने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. वुहान ओपन वुमेन डबल्स ट्रॉफी जिंकत आपली विजयी घौडदौड कायम राखली. टॉप सीडेड असलेल्या सानिया-मार्टिना जोडीने ही सातवी स्पर्धा जिंकली आहे.

पाकिस्तानला भारताचे सडेतोड उत्तर, 'दहशतवाद सोडा आणि चर्चेला बसा'

भारताने पाकिस्तानला चांगल्याच शब्दात खडसावलेय. चार सूत्र कशाला हवेत, एकच सूत्र अवलंबू. आधी तुम्हा चालवलेला दहशतवाद सोडा आणि चर्चेला बसा, असे रोखठोक उत्तर भारताच्या  परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकला दिले.

फेसबुकवर प्रोफाईल फोटो ठिकाणी आता व्हिडिओ करु शकता अपलोड

सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकचा वापर करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आता तुम्ही प्रोफाईल फोटोच्या जागी आपला छोटा व्हिडिओ अपलोड करु शकता.

नितीश कुमार ‘अहंकारी’ : नरेंद्र मोदी

राज्यातील नितीश कुमार सरकारवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार शरसंधान केले. बिहारमध्ये सध्या जे सरकार आहे त्यांना एवढा अहंकार आहे की, मी काहीही पाठवले तरी ते परत पाठवतात, असा टोला मोदींनी हाणला. 

स्वयंपाकाचा अनुदानित सिलिंडर ४२ रुपयांनी स्वस्त

मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी दिलेय. स्वयंपाकाच्या अनुदानित सिलिंडर दरात ४२ रुपयांनी कपात केली आहे. तर एटीएफ तसेच जेट इंधनाच्या दरात ५.५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, विनाअनुदानित रॉकेलच्या दरात ५४ पैशांची वाढ झाली असून ते आता प्रति लिटर ४३.१८ रुपये झाले आहे. 

परदेशात काळापैसा ठेवणाऱ्यांना दंड, सरकारच्या तिजोरीत ३,७७० कोटी जमा

परदेशात काळा पैसा ठेवणाऱ्या लोकांकडून दंड वसून करण्यात आलाय. या दंडापोटी केंद्र सरकारच्या तिजोरीत ३,७७० कोटी रुपये जमा झालेत. ही माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली.

नवाझ शराफींचा पुन्हा काश्मीर राग, म्हणाले यूएनचं सर्वात मोठं अपयश

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत काश्मीर मुद्द्यावर पुन्हा भारताला घेरण्याचा प्रयत्न केला. नवाझ शरीफ म्हणाले काश्मीर मुद्द्याबाबत संयुक्त राष्ट्र अपयशी ठरलाय. याबाबतीत शांततेनं आणि चर्चेनं मार्ग काढण्याची गरज आहे.

मोदींच्या परदेश दौऱ्यांचे प्रत्यक्ष कृतीला जोड हवी : रघुराम राजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अनेक देशांचे दौरे करीत आहेत. विरोधकांनी मोदींच्या दौऱ्यावर टीका केलेय. तर सोशल मीडियावर मोदींना देशात शोधून दाखवा अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. त्याचवेळी रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी मोदींबाबत एक भाष्य केलेय. मोदींच्या परदेश दौऱ्यांचे प्रत्यक्ष कृतीला जोड हवी, असे राजन यांनी म्हटलेय.