नवी दिल्ली : देशात समान नागरी कायदा लागू करणं ही काळाची गरज आहे असं मत केंद्रीय कायदा मंत्री सदानंद गौडा यांनी व्यक्त केलंय.
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी सरकार काय करतंय, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं विचारलाय. त्यावर गौडा यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.
पण कायदा लागू करणं ही काळाची गरज असली, तरी भारतीय समाजाची वैविध्यपूर्ण रचना लक्षात घेता, कायदा अस्तित्वात आणण्यासाठी व्यापक चर्चेची गरज आहे असंही गौडांनी स्पष्ट केलंय.
समान नागरी कायदा अस्तित्वात यावा, अशी भारतीय घटनेत उल्लेख आहे. पण गेल्या सहा दशकात ते शक्य झालेलं नाही. त्याचपार्श्वभूमीवर हा कायदा लागू करण्यासाठी सरकारकडे काय योजना आहे, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं विचारलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.