अक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झाला होता क्रिकेटर; दोन मुलांची आई असतानाही केलं लग्न

1990 च्या दशकातील चित्रपट, गाणी आणि कलाकार आजही प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. अशा काही अभिनेत्री होत्या ज्यांनी मोजक्याच चित्रपटांनी आपल्या चाहत्यांना वेड लावले. मात्र, काही चित्रपटांनंतर त्या इंडस्ट्रीतून गायब झाल्या.

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 10, 2025, 07:08 PM IST
अक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झाला होता क्रिकेटर; दोन मुलांची आई असतानाही केलं लग्न title=

चित्रपटसृष्टीसाठी 1990 हे दशक खूपच खास होते. या दशकातील चित्रपट, गाणी आणि अभिनेत्री आजही प्रेक्षकांना खूप आवडतात. यामध्ये अशा काही अभिनेत्री होत्या ज्यांनी आपल्या चित्रपटांनी चाहत्यांना वेड लावले. मात्र, यामधील काही  अभिनेत्री इंडस्ट्रीतून गायब झाल्या. अशीच एक अभिनेत्री होती जिचे नाव फरहीन. फरहीनने 1992 मध्ये 'जान तेरे नाम' या चित्रपटातून पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटापासून ती रातोरात स्टार झाली. या चित्रपटात फरहीन रोनित रॉयसोबत दिसली होती.

फरहीनच्या प्रेमात वेडा झाला होता हा क्रिकेटर

या चित्रपटातील फरहीन आणि रोनितचे 'कल कॉलेज बंद हो जायेगा' हे गाणे प्रचंड गाजले होते. अभिनेत्रीने याआधी अक्षय कुमार आणि रोनित रॉय सारख्या कलाकारांसोबत काम केले होते. जेव्हा फरहीनने इंडस्ट्री सोडली आणि लग्न केले तेव्हा तिचे करिअर शिखरावर होते. सध्या फरहीन जवळपास 24 वर्षांपासून इंडस्ट्रीपासून दूर आहे. 'जान तेरे नाम' या चित्रपटानंतर फरहीन 'सैनिक', 'नजर के सामने', 'फौज', 'दिल की बाजी' आणि 'आग का तुफान' या चित्रपटांमध्ये दिसली. फरहीनने क्रिकेटर मनोज प्रभाकरला भेटली आणि त्याच्या प्रेमात पडली. त्यानंतर फरहीनने करिअर सोडून मनोजशी लग्न केले.

2 मुलांच्या आईसोबत घेतले सात फेरे

लग्न आणि निकाहबाबत फरहीनने मुलाखतीत सांगितले होते की, लोकांना वाटत होते की ती मनोजसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे. मुस्लिम कायद्यानुसार तिचे लग्न 1994 मध्ये मनोजसोबत झाले होते. पण हिंदू कायद्यानुसार बघितले तर मनोज प्रभाकर घटस्फोटीत नसल्यामुळे ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. 2008 मध्ये मनोज प्रभाकर यांच्या घटस्फोटानंतर दोघांनी 2009 मध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार पुन्हा लग्न केले. हिंदू कायद्यानुसार लग्न झाले तेव्हा फरहीन आई झाली होती. तिचे दोन्ही मुले तिच्या लग्नाला उपस्थित होते.

फरहीन सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सतत चाहत्यांना तिचे लेटेस्ट फोटो शेअर करत असते. फरहीन प्रभाकर नावाने तिचे इन्स्टाग्रामवर अकाउंट आहे. सध्या ती तिच्या कौटुंबिक जीवनाचा आनंद घेत आहे.