ब्लॉकबस्टर 'पुष्पा 2' चित्रपट कसा बनवला? पाहा 2 मिनिटांचा BTS व्हिडीओ

भारतात सर्वात जास्त कमाई करणारा 'पुष्पा 2' चित्रपट कसा बनवला गेला? तुम्हाला जाणून घ्याचे असेल तर पाहा फक्त हा 2 मिनिटांचा व्हिडीओ. 

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 10, 2025, 01:12 PM IST
ब्लॉकबस्टर 'पुष्पा 2' चित्रपट कसा बनवला? पाहा 2 मिनिटांचा BTS व्हिडीओ title=

Pushpa 2 The Rule Making Video: 'पुष्पा 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'पुष्पा 2' ने आजही आपली बॉक्स ऑफिसवरील कमाई कायम ठेवली आहे. अल्लू अर्जुन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी करत आहे. रिलीज होऊन या चित्रपटाला 35 दिवस उलटले असले तरी चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट अजूनही धुमाकूळ घालत आहे.

अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहेत. दिग्दर्शक सुकुमार आणि अल्लू अर्जुन यांचा उत्कृष्ट अभिनय पाहण्यासाठी चाहते थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. 'पुष्पा 2' चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर निर्मात्यांनी चित्रपटाच्या निर्मितीचा एक खास पडद्यामागचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. 

पाहा व्हिडीओ

टी-सिरीजने 'पुष्पा 2' चित्रपटाचा निर्मितीचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी, 'पेश है भारतीय सिनेमा का इंडस्ट्री हिट - पुष्पा 2: द रूल (मेकिंग)! असं कॅप्शन दिलं आहे. व्हिडिओमध्ये प्रत्येक फ्रेममागील समर्पण, सर्जनशीलता आणि अपार मेहनत यावर प्रकाश टाकण्यात आला आहे, जो चित्रपटाची भव्यता दर्शवतो आहे. या BTS व्हिडिओमध्ये दिग्दर्शक सुकुमार आणि अभिनेते अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्यातील महत्त्वपूर्ण संभाषण देखील दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो प्रेक्षकांनी पाहिला आहे. चाहते अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक सुकुमार यांचं कौतुक देखील करत आहेत. 

'पुष्पा 2' चे वर्ल्डवाइड कलेक्शन 

'पुष्पा 2' चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाला मिळालेल्या अप्रतिम यशाबद्दल आणि प्रेमाबद्दल प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले आहेत. 'पुष्पा 2' चित्रपटाने जगभरात तब्बल 1831 कोटींची कमाई केली आहे. त्यासोबतच चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहेत.  अल्लू अर्जुनचा हा चित्रपटात भारतातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट बनला आहे.

'पुष्पा 2'चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले असून यामध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल हे मुख्य भूमिकेत आहेत. माइथ्री मूवी मेकर्स आणि सुकुमार राइटिंग्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून त्याचे संगीत टी-सीरीजने दिले आहे. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट 5 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 500 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.