देशात राहायचे असेल तर गोमांस खाणे सोडून द्या : मनोहर लाल खट्टर

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी गोमांसबाबत वादग्रस्त विधान केलेय. मुस्लिमांना गोमांस खायचे असेल तर त्यांना देश सोडावा लागेल. जर गोमांस खाण्याचे सोडून दिले तर ते देशात राहू शकतात, असे खट्टर यांनी म्हटलेय.

PTI | Updated: Oct 16, 2015, 11:00 AM IST
देशात राहायचे असेल तर गोमांस खाणे सोडून द्या : मनोहर लाल खट्टर title=

चंदीगड : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी गोमांसबाबत वादग्रस्त विधान केलेय. मुस्लिमांना गोमांस खायचे असेल तर त्यांना देश सोडावा लागेल. जर गोमांस खाण्याचे सोडून दिले तर ते देशात राहू शकतात, असे खट्टर यांनी म्हटलेय.

अधिक वाचा : गाईच्या बाबतीत काही रंजक गोष्टी, वाचून तुम्ही व्हाल हैराण

मनोहर खट्टर यांनी 'इंडियन एक्सप्रेस' या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीच्यावेळी हे वादग्रस्त विधान केलेय. दरम्यान, गौमांस खल्ल्याची अफवा पसरवल्याने मोहम्मद अखलाख यांची मारहान करुन हत्या करण्यात आल्याची घटना चुकीची आणि बेजबाबदार असल्याचे म्हटलेय.

अधिक वाचा : 'गाय आणि बकरीच्या मांसात तोच फरक आहे जो पत्नी आणि बहिणीमध्ये'

गाय, गीता आणि सरस्वती यांच्याशी देशातील बहुसंख्य लोक श्रद्धेने जोडले गेलेत. कोणाच्या धार्मिक भावना दुखविणे चुकीचे आहे. ते कोणाला सहन होणार नाही. त्यामुळे मुस्लिमांनी गोमांस खाणे सोडू द्यावे, त्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखवत नाहीत. जर त्यांना गोमांस खायचे असेल तर त्यांना देशात राहता येणार नाही, त्यांना देश सोडावा लागेल, असे खट्टर यांनी विधान केलेय.

गाय, हे धार्मिक भावनेचे प्रतिक आहे. त्यामुळे दादरी येथील घटना हिंसेमुळे होऊ शकली. मात्र, असा हल्ला करणे चुकीचे आहे. तसेच कोणाला असे मारणेही चुकीचे आहे, असेही खट्टर म्हणालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.