नॅशनल हेराल्ड खटला : जज बदलण्याची सोनिया, राहुल गांधी यांची मागणी

काँग्रेस आणि गांधी कुटुंबीयांसाठी डोकेदुखी ठरलेल्या नॅशनल हेराल्ड खटल्याप्रकरणी महत्त्वाची सुनावणी होणार आहे. काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि गांधी कुटुंबीयांशी संबधित व्यक्ती या प्रकरणात अडकल्यात. या खटल्याच्या सुनावणीआधी जज बदली करण्याची मागणी सोनिया आणि राहुल गांधींकडून करण्यात आलीय.

PTI | Updated: Oct 15, 2015, 10:38 AM IST
नॅशनल हेराल्ड खटला : जज बदलण्याची सोनिया, राहुल गांधी यांची मागणी title=

नवी दिल्ली : काँग्रेस आणि गांधी कुटुंबीयांसाठी डोकेदुखी ठरलेल्या नॅशनल हेराल्ड खटल्याप्रकरणी महत्त्वाची सुनावणी होणार आहे. काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि गांधी कुटुंबीयांशी संबधित व्यक्ती या प्रकरणात अडकल्यात. या खटल्याच्या सुनावणीआधी जज बदली करण्याची मागणी सोनिया आणि राहुल गांधींकडून करण्यात आलीय.

या प्रकरणी आधी सुनावणी करणाऱ्या जजकडे या खटल्याचं काम सोपवण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावतीने कपिल सिब्बल यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

नॅशनल हेराल्ड खटल्याची जबाबदारी जस्टिस सुनील गौर यांच्याकडे द्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आलीय.. या खटल्यात १५ महिन्यांत दोन जज बदलण्यात आले आहेत. आता तिसरे जज या प्रकरणाची सुनावणी करत आहेत. दिल्ली हायकोर्टात या प्रकरणी सुनावणी होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.