नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या किमतीत घट होत असताना आता डिझेलच्या दरात वाढ झाले. ९५ पैशांनी डिझेल महाग झालेच.
देशभरात डिझेल लिटरमागे ९५ पैशांची वाढ झाली असली तरी पेट्रोलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मध्यरात्रीपासून किंमतीतील बदल लागू झाले आहेत. यापूर्वी ३० सप्टेंबर तेल मार्केटिंग कंपन्यांनी डिझेलच्या दरात ५० पैशांची वाढ केली होती. तेव्हा पेट्रोल दोन रूपयांनी स्वस्त केले होते.
दिल्लीत डिझेलचा दर ४५.९० रूपये प्रति लिटर तर मुंबईत ५३.०९ रूपये प्रति लिटर झाला आहे. सध्या महागाई वाढली असताना डिझेल दरात वाढ झाल्याने महागाईत अधिक तेल पडणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.