Cricket News : क्रिकेट मॅच पाहायला गेला आणि लखपती होऊन परतला असं कोणी म्हंटलं तर कदाचित विश्वास बसणार नाही. पण एका क्रिकेट चाहत्यासोबत असं खरंच घडलंय. डरबन येथे SA20 लीगमध्ये डरबन सुपर जायंट्स विरुद्ध प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यात सामना सुरु असताना एका क्रिकेट चाहत्याच नशीब फळफळलं. सामना सुरु असताना त्याने स्टॅन्डमध्ये बसून सामना पाहत असताना एका हाताने जबरदस्त कॅच पकडला, ज्यामुळे तो काही सेकंदात लखपती बनला. सध्या त्याने घेतलेल्या लाखमोलाच्या कॅचचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
SA20 लीगमध्ये डरबन सुपर जायंट्स विरुद्ध प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यातील सामन्या दरम्यान डरबन सुपरजायंट्सची इनिंग सुरु होती. तेव्हा केन विलियमसनने 17 व्या ओव्हरमध्ये ईथन बॉशच्या स्लो बॉलवर सिक्स मारला आणि बॉल थेट स्टॅन्डमध्ये पोहोचवला. बॉल स्टॅन्डमध्ये पोहोचला तेवढ्यात सामना पाहायला आलेल्या एका प्रेक्षकाने एका हाताने तो कॅच पकडला. सामन्यादरम्यान स्पर्धेच्या स्पॉन्सरनी 'कॅच अ मिलियन' ही स्पर्धा आयोजित केली होती आणि त्याचा भाग म्हणून अप्रतिम कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकाला सामना संपल्यावर मोठी रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली.
Super catch alert in the stands! DurbanSuperGiant KaneWilliamson goes berserk as he smashes a colossal six
Keep watching the SA20 LIVE on Disney Hotstar| DSGvPC pic.twitter.com/KwiTpo4yPa
— JioCinema (JioCinema) January 10, 2025
SA20 लीगमध्ये स्पॉन्सरने 'कॅच अ मिलियन' या स्पर्धेच्या नियमांनुसार, 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या कोणत्याही प्रेक्षकाने स्टॅन्डमध्ये सिक्ससाठी आलेला बॉल एका हाताने कॅच केला तर त्याला एक मिलियन रँडचा हिस्सा दिला जातो. परंतु जर प्रेक्षक प्रायोजकाचा क्लायंट असेल तर बक्षिसाची ही रक्कम दुप्पट केली जाते. असेच काहीसे केन विलियमसनने मारलेल्या सिक्सचा कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकासोबत घडले. कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकाला सामना संपल्यावर 2 मिलियन साउथ अफ्रीकन रँड म्हणजे भारतीय रुपयांनुसार 90 लाख रुपये मिळाले.