परदेशात काळापैसा ठेवणाऱ्यांना दंड, सरकारच्या तिजोरीत ३,७७० कोटी जमा

परदेशात काळा पैसा ठेवणाऱ्या लोकांकडून दंड वसून करण्यात आलाय. या दंडापोटी केंद्र सरकारच्या तिजोरीत ३,७७० कोटी रुपये जमा झालेत. ही माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली.

PTI | Updated: Oct 1, 2015, 04:09 PM IST
परदेशात काळापैसा ठेवणाऱ्यांना दंड, सरकारच्या तिजोरीत ३,७७० कोटी जमा  title=

नवी दिल्ली : परदेशात काळा पैसा ठेवणाऱ्या लोकांकडून दंड वसून करण्यात आलाय. या दंडापोटी केंद्र सरकारच्या तिजोरीत ३,७७० कोटी रुपये जमा झालेत. ही माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली.

काळा पैसा जाहीर करण्यासाठी सरकारने एक खिडकी योजने सुरु केली. याच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत ३,७७० कोटी रुपये जमा झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून गुरूवारी जाहीर करण्यात आली. 

या एक खिडकी योजनेच्या माध्यमातून ६३८ जणांनी सरकारकडे त्यांच्या काळ्या पैशाचा तपशील जाहीर केला असल्याचे  केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून सांगण्यात आले. काळा पैसा जाहीर करण्यासाठी सरकारने १ जुलैपासून तीन महिन्यांची एक खिडकी मुदत योजना जाहीर केली होती.

बेहिशेबी संपत्तीवर आणि पैशांवर ३० टक्के कर आणि तेवढीच रक्कम दंड म्हणून भरावी लागणार होती. गेल्या मे महिन्यात संसदेने काळ्या पैशांविरुद्धचा नवा कायदा पारीत केला होता. या कायद्याला २६ मे रोजी राष्ट्रपतींनी मान्यता दिली. या कायद्यांतर्गत ही एक खिडकी योजना जाहीर करण्यात आली होती. 

दरम्यान, बेकायदा, काळा पैसा ३० सप्टेंबरपर्यंत जाहीर न केल्यास कायद्यानुसार कारवाई होईल, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (सीबीडीटी) सांगण्यात आले होते. त्यानंतर याला चांगला प्रतिसाद मिळाला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.