10

राम मंदिर उभारण्यास जगातील कोणतीही ताकत रोखू शकत : साक्षी

जगाच्या नकाशावरील पाकिस्तान अस्तित्वात राहणार नाही. भारत हा काश्मीरचा गुलाम नाही तर आता लोहोरची मागणी करेल. पाकिस्तान अधिकृत काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंक आहे आणि भारत याच्यासह राहिल, असे बेधडक विधान खासदार सच्चिदानंद हरी साक्षी यांनी केलेय. दरम्यान, अयोध्येत राम मंदिर बांधण्याबाबत कोणीही रोखू शकत नाही, असे ते यावेळी म्हणालेत.

येमेन हवाई हल्ला, १३ भारतीय जिवंत

सौदी अरेबियाने केलेल्या हवाई हल्यात किती जण ठार झालेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, २० भारतीय ठार झाल्याचे वृत्त चुकीचे आहे. १३ भारतीय जिवंत असून ७ जण बेपत्ता असल्याचे भारतातर्फे स्पष्ट करण्यात आलेय.

बिहार विधानसभा निवडणूक तारखा आज जाहीर होणार?

येत्या काही दिवसात बिहारमधल्या विधानसभा निवडणgकीच्या तयारी संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाची आज अत्यंत महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर आज संध्याकाळीच बिहारच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. 

'वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्यांना 'जजिया कर' द्यावा लागणार'

जम्मूतील माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जामाऱ्यांना जजिया कर द्यावा लागणार आहे, अशी टीका काँग्रेसने केलेय.

अवघ्या ४५ हजारांसाठी १ वर्षाच्या मुलाला पित्यानंच विकलं

सहारनपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडलीय. इथं एका व्यक्तीनं आपल्या एक वर्षाच्या मुलाला अवघ्या ४५ हजारांमध्ये विकल्याचं कळतंय. ही घटना सहारनपूर जिल्ह्यातील गगलहेडी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली. 

अमेरिकन ओपन : राफाएल नदालचे आव्हान संपुष्टात

माजी वर्ल्ड नंबर वन राफाएल नदालचे अमेरिकन ओपनमधील आव्हान धक्कादायकरित्या दुसऱ्याच राऊंडमध्ये संपुष्टात आलं. 

शेअर बाजारात आपटी, सेन्सेक्स-निफ्टी कोसळले

सेन्सेक्स आणि निफ्टी आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कोसळले. ५६३ अंशांनी कोसळत सेन्सेक्स २५२०१ अंशांवर बंद झाला. 

बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग, मुलायमसिंगांना पटविण्यासाठी लालूंची धावपळ

महाआघाडीतून मुलायम सिंग यादव बाहेर पडल्याने त्यांची समजूत काढण्यासाठी आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांची धावाधाव सुरू झालीय. 

नरेंद्र मोदी सरकारची झाडाझडती

दिल्लीत सुरू असलेल्या भाजप आणि आरएसएसच्या समन्वय बैठकीत सरसंघचालकांनी मोदी सरकारची झाडाझडती घेतलीय.

एकाच स्मार्ट कार्डद्वारे देशभरात प्रवास आता शक्य

एकाच स्मार्ट कार्डद्वारे देशभरात प्रवास करणं आता शक्य होणार आहे. कारण विविध मेट्रो आणि अन्य वाहतूक व्यवस्थांमार्फत प्रवास करता येईल, असं नवीन स्मार्ट कार्ड नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.