10
10
भाजपने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ४३ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करणारा राजकीय पहिला पक्ष ठरलाय. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री जेडी नड्डा यांनी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीबरोबर झालेल्या बैठकीनंतर उमेदवारांची यादी जाहीर केली.
अभिनेता हृतिक रोशन आणि सुझानच्या घटस्फोटानंतर आता पुन्हा एक जोडपं घटस्फोट घेतंय. अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आणि अभिनेता रणवीर शौरी यांनी आपल्या पाच वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय.
भाजप प्रणित विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं दिल्ली विद्यापीठापाठोपाठ आज जवाहरलाल नेहरू विद्यापीठातली विद्यार्थी निवडणूक जिंकली. तब्बल १४ वर्षानंतर जेएनयूमध्ये अभाविपनं विजय मिळवलाय.
मध्यप्रदेशमधील झाबुआ जिल्ह्यात पटेलावद येथील हॉटेलमध्ये झालेल्या सिलिंडर स्फोट दुर्घटनेतील बळींचा आकडा वाढलाय. मृतांची संख्या ८२ वर पोहोचली आहे.
मध्य प्रदेशमधील झाबुआ जिल्ह्यातील पटेलावदमध्ये आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास एका हॉटेलमध्ये सिलिंडरचा स्फोट होऊन ३० जण ठार झाले असून ८० लोक जखमी झालेत. जखमींना इंदोर आणि रतलाम रेफर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गृहमंत्री बाबूलाल गौर यांनी चौकशीचे आदेश दिलेत.
इसिस या दहशतवादी संघटनेमध्ये तरुणांना ओढण्याचे काम करणाऱ्या भारतीय महिला हस्तक हिला पोलिसांनी अटक केलेय. तिला आधी दुबईतून देशात आणण्यात आले.
भारताच्या लिअँडर पेसनं मार्टिना हिंगिसच्या साथीनं अमेरिकन ओपनच्या मिक्स डबल्सचं अजिंक्यपद पटकावलं. या सीझनमधील या दोघांचं हे तिसरं मेजर टायटल ठरलं. फायनलमध्ये पेस-मार्टिनानं अमेरिकेच्या सॅम क्युरी आणि बेथानी माटेक सँड्स जोडीचा 6-4, 3-6, 10-7 नं मात केली.पेस आणि हिंगिसनं याआधी या सीझनमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डनला गवसणी घातली होती.
दुरांतो एक्स्प्रेसला सिंकदराबाद येथे अपघात झाला. रेल्वेचे ९ डब्बे रुळावरून घसरल्याने दोन प्रवासी ठार तर ७ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा अपघात रात्री २.२० ते २.१५ वाजण्याच्या दरम्यान झाला.
जगात कुठेही जा, लग्नाबाबत एक समान विचार सर्वत्र दिसून येतो. प्रत्येकाला आपला लाईफ पार्टनर कसा असावा, याबाबत समानता दिसून येत आहे. जोडीदार आपल्यासोबत किती प्रामाणिकपणे संबंध निभावेल, याचा समान धागा दिसतो.
भारताच्या सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस या दुकलीने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.