वाराणसी: दिल्लीजवळ ग्रेटर नोएडाच्या दादरीमध्ये गोमांस खान्याच्या अफवेवरून अखलाक नावाच्या ५० वर्षीय व्यक्तीची मारून-मारून हत्या करण्यात आली. ही घटना राजकारणाशी प्रेरित असून, गाय माता नाही फक्त प्राणी असल्याचं माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी म्हटलंय.
आणखी वाचा - दादरी दुर्घटना : अरविंद केजरीवाल यांना रोखलं, मोदींचे मौन का?
शनिवारी काशी हिंदू विश्वविद्यालयातील एका कार्यक्रमात काटजू म्हणाले, 'गाय फक्त एक प्राणी आहे आणि कोणताही प्राणी माता असू शकत नाही. जर मला गोमांस खाणं आवडतं तर यात चूक काय आहे. जगभरात लोकं गोमांस खातात. जर मला ते खाणं आवडतं तर मला कुणी थांबवू शकत नाही'. काटजू पुढे हे सुद्धा म्हणाले की, गोमांस खाल्ल्यानं काही नुकसान होत नाही.
आणखी वाचा - बीफ खाल्ल्याच्या अफवेनंतर जमावानं मारहाण करत केलं ठार
यानंतर काटजू यांच्या वक्तव्याचा निषेध करत अनेक विद्यार्थ्यांनी प्रदर्शन केलं आणि त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांनी काटजू यांचा रस्ता अडवण्याचाही प्रयत्न केला. अखलाकच्या हत्येचा काटजू यांनी निषेध केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.