पाकिस्तानला भारताचे सडेतोड उत्तर, 'दहशतवाद सोडा आणि चर्चेला बसा'

भारताने पाकिस्तानला चांगल्याच शब्दात खडसावलेय. चार सूत्र कशाला हवेत, एकच सूत्र अवलंबू. आधी तुम्हा चालवलेला दहशतवाद सोडा आणि चर्चेला बसा, असे रोखठोक उत्तर भारताच्या  परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकला दिले.

PTI | Updated: Oct 2, 2015, 09:11 PM IST
पाकिस्तानला भारताचे सडेतोड उत्तर, 'दहशतवाद सोडा आणि चर्चेला बसा' title=

संयुक्त राष्ट्रसंघ : भारताने पाकिस्तानला चांगल्याच शब्दात खडसावलेय. चार सूत्र कशाला हवेत, एकच सूत्र अवलंबू. आधी तुम्हा चालवलेला दहशतवाद सोडा आणि चर्चेला बसा, असे रोखठोक उत्तर भारताच्या  परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकला दिले.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या आरोपांचे भारताने खंडन करत त्याचा समाचार घेतला. नवाज शरीफ यांनी काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी चार सूत्री प्रस्ताव मांडला. पण हा प्रस्ताव भारताने फेटाळून लावला. दोन्ही देशांत शांतता राहावी असे पाकिस्तानला वाटत असेल तर फक्त एकाच सूत्राची गरज आहे. पाकिस्तानने दहशतवाद सोडून चर्चेला बसावे, स्वराज यांनी स्पष्ट शब्दात बजावले. 

चर्चेतून यश मिळाले तर आम्ही सर्व मुद्दे सोडवायला तयार राहू, असे स्वराज म्हणाल्या. यावेळी त्यांनी मुंबई हल्ल्याचा कट रचणारे दहशतवादी पाकिस्तानात खुलेआम फिरत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. भारतात दहशतवादी कारवायांना कारणीभूत असणारे हे हल्लेखोर पाकिस्तानात आज मोकाट फिरत आहे. दहशतवाद्यांना घुसविण्यासाठी पाकिस्तान सातत्याने सिमेवर गोळीबार करत आहे, असे त्या म्हणाल्यात.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुषमा स्वराज यांच्या विषय मांडणीचे कौतुक केले. भारताकडून पाकिस्तानमध्ये अस्थिरता पसरविण्यात येत असल्याचा आरोप नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बोलताना केला होता. त्याला चोख उत्तर स्वराज यांनी दिलेय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.