मोदींच्या परदेश दौऱ्यांचे प्रत्यक्ष कृतीला जोड हवी : रघुराम राजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अनेक देशांचे दौरे करीत आहेत. विरोधकांनी मोदींच्या दौऱ्यावर टीका केलेय. तर सोशल मीडियावर मोदींना देशात शोधून दाखवा अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. त्याचवेळी रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी मोदींबाबत एक भाष्य केलेय. मोदींच्या परदेश दौऱ्यांचे प्रत्यक्ष कृतीला जोड हवी, असे राजन यांनी म्हटलेय. 

PTI | Updated: Sep 30, 2015, 11:46 PM IST
मोदींच्या परदेश दौऱ्यांचे प्रत्यक्ष कृतीला जोड हवी : रघुराम राजन title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अनेक देशांचे दौरे करीत आहेत. विरोधकांनी मोदींच्या दौऱ्यावर टीका केलेय. तर सोशल मीडियावर मोदींना देशात शोधून दाखवा अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. त्याचवेळी रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी मोदींबाबत एक भाष्य केलेय. मोदींच्या परदेश दौऱ्यांचे प्रत्यक्ष कृतीला जोड हवी, असे राजन यांनी म्हटलेय. 

मोदी देशाला पुढे घेऊन जातील. मात्र, त्यांच्या परदेश दौऱ्यांना प्रत्यक्षात कृतीची जोड असायला हवी. मोदी वाकबगार नेते आहेत. ते देशाला जगासमोर उत्तमरित्या सादर करू शकतात यात काहीच शंका नाही. त्यांच्या परदेश दौऱ्यांमुळे जगाचा भारताकडे बघण्याच्या दृष्टीकोनात सकारात्मक बदल देखील होताना दिसत आहे, असे रघुराम राजन एका मुलाखतीत म्हणालेत.

परदेशी गुंतवणूक वाढविण्यासाठी मोदींनी आपल्या दौऱ्यांमध्ये भारत एक उत्तम बाजारपेठ असल्याचे पटवून दिलेय. ते वाखाणण्याजोगे आहे. पण वास्तवात येथे गुंतवणुकदारांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागल्यास विरोधाभास निर्माण होईल, अशी भिती राजन यांनी व्यक्त केलेय.

ही भिती दूर होण्यासाठी मोदींच्या घोषणांना प्रत्यक्षात कृतीची जोड देऊन देशात सुधारणांमध्ये सातत्य राहिल यासाठी प्रयत्नशील राहायला हवे, असे राजन यांनी सांगितले. 

 * इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.