सानिया - मार्टिनाने वुहान ओपन महिला किताब जिंकला

जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या दुकलीने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. वुहान ओपन वुमेन डबल्स ट्रॉफी जिंकत आपली विजयी घौडदौड कायम राखली. टॉप सीडेड असलेल्या सानिया-मार्टिना जोडीने ही सातवी स्पर्धा जिंकली आहे.

PTI | Updated: Oct 3, 2015, 05:38 PM IST
सानिया - मार्टिनाने वुहान ओपन महिला किताब जिंकला title=
विजयी चषकानंतर मार्टिना-सानिया. छाया - एपी

वुहान : जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या दुकलीने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. वुहान ओपन वुमेन डबल्स ट्रॉफी जिंकत आपली विजयी घौडदौड कायम राखली. टॉप सीडेड असलेल्या सानिया-मार्टिना जोडीने ही सातवी स्पर्धा जिंकली आहे.

सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीने वुहान खुल्या टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळे आपल्या खात्यात आणखी एक पदक भर टाकतील अशी अटकळ होती. ती त्यांनी खरी दाखवून दिली.  हाओ चिंग चान आणि युंग जॅन चान या तैपेईच्या जोडीवर ६-२, ६-१ असा सहज विजय मिळवला. तर अंतिम सामन्यात या जोडीने कॅमेलिया बेगू व मोनिका निकूलेसू या जोडीचा ६ -२, ६ - ३ असा पराभव केला आणि वुहानचा किताब जिंकला.

ही स्पर्धा जिंकल्यानंतर सानियाने टायटल नंबर ७ असा संदेश फोटोसह ट्विटरवर पोस्ट केला आहे. पहिल्या फेरीत बाय मिळालेल्या सानिया - मार्टिना जोडीला नंतरच्या फे-यांमध्येही फारसा प्रतिकार झाला नाही. आत्तापर्यंत त्यांनी इंडियन वेल्स, मियामी, चार्ल्सटन, विम्बल्डन, दी युएस ओपन, ग्वांग्झी आणि वुहान अशा सात स्पर्धा जिंकल्या आहेत. आता त्यांच्यासमोर बीजिंगमध्ये चायना ओपन जिंकण्याचे आव्हान आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.