नवी दिल्ली : दादरी येथील दुर्घटनेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घटनास्थळी जाण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे केजरीवाल यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. दरम्यान, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. याप्रकणी मोदींनी मौन का धारण केलेय?
दादरीत अनेक नेत्यांनी भेट दिली, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अद्याप यावर मौनच बाळगले आहे, मोदींनीही या गावाला भेट देण्याची गरज आहे, अरविंद केजरीवाल म्हणालेत.
शुक्रवारी केंद्रीय मंत्री महेश शर्मा तसेच खासदार असदुद्दीन ओवैसी यांना शुक्रवारी रोखण्यात आले नाही. मग मलाच का? मी तर शांतीप्रिय माणूस आहे. आणि केवळ अख्लकच्या कुटुंबियांना भेटायला जात होतो, अशा शब्दांत केजरीवाल यांनी ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.
दादरी गावामध्ये गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून जमावाकडून हत्या करण्यात आलेल्या मोहम्मद अख्लक यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी शर्मा, औवेसी गेले होते. आज केजरीवाल यांच्या शिष्टमंडळाला मात्र अख्लक यांच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यांना गावाबाहेर रोखण्यात आले.
या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी ट्विट केलेय. माझ्यावर सतत राजकारण करत असल्याचा आरोप केला जातो. होय, मी राजकारण करतो. मात्र, मी एकता आणि प्रेमाचे राजकारण करतो. ते द्वेषाचे राजकारण करतात, अशा शब्दांत त्यांनी टीकाही केली.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पीडित कुटुंबीयांना २० लाखांची मदत जाहीर केली आहे.
Many pol leaders hv visited Dadri. But PM is silent till now. People will be happy if PM also visited n reassured victims n villagers
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) October 3, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.