आकाशात विमान उडवतांनाच पायलटचा मृत्यू

 बोस्टन जाणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात पायलटची तब्येत अचानक बिघडली आणि विमानातच त्यांचा मृत्यू झाला. विमान चालवतांनाच पायलटचा मृत्यू झाल्यानंतर सहाय्यक पायलटनं अर्ध्या रस्त्यातून विमान परत न्यूयॉर्कला आणलं.

PTI | Updated: Oct 6, 2015, 11:52 AM IST
आकाशात विमान उडवतांनाच पायलटचा मृत्यू title=

सारयाक्यूज, अमेरिका:  बोस्टन जाणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात पायलटची तब्येत अचानक बिघडली आणि विमानातच त्यांचा मृत्यू झाला. विमान चालवतांनाच पायलटचा मृत्यू झाल्यानंतर सहाय्यक पायलटनं अर्ध्या रस्त्यातून विमान परत न्यूयॉर्कला आणलं.

आणखी वाचा - फ्रान्समध्ये आकाशातून पडली कारवर ५०० किलोची गाय

अमेरिकन एअरलाइनचे प्रवक्ते एंड्रिया ह्यूजली यांनी सांगितलं की, फ्लाइट ५५० रविवारी स्थानिक वेळेनुसार रात्री ११ वाजून ५५ मिनीटांनी फिनिक्सहून बोस्टनकडे जायला निघालं. विमानातील पायलटची तब्येत अचानक बिघडली आणि लगेच त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा सहाय्यक पायलटनं सकाळी सात वाजताच्या आधी सायराक्यूज इथं विमान सुरक्षितपणे उतरवलं.

आणखी वाचा - विमानाच्या टॉयलेटमध्ये करायची सेक्स, एअर होस्टेसने कमविले ६ लाख ५० हजार युरो

त्यांनी सांगितलं, विमानात १४७ प्रवासी आणि पाच क्रू मेंबर्स होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.