'आधार कार्ड'ची व्याप्ती वाढवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

'आधार कार्ड'बाबत अद्याप ठोस निर्णय होत नाही. त्यामुळे 'आधार कार्ड'बाबत संभ्रम कायम आहे. दरम्यान, 'आधार' सक्तीचे नाही, असा कोर्टाने याआधीच निर्णय दिलाय. आता 'आधार कार्ड'ची व्याप्ती वाढवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय.

PTI | Updated: Oct 7, 2015, 08:43 PM IST
'आधार कार्ड'ची व्याप्ती वाढवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार  title=

नवी दिल्ली : 'आधार कार्ड'बाबत अद्याप ठोस निर्णय होत नाही. त्यामुळे 'आधार कार्ड'बाबत संभ्रम कायम आहे. दरम्यान, 'आधार' सक्तीचे नाही, असा कोर्टाने याआधीच निर्णय दिलाय. आता 'आधार कार्ड'ची व्याप्ती वाढवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय.

अधिक वाचा : आधार कार्ड सक्तीचे नाही : सर्वोच्च न्यायालय

केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक, सेबी, इरडा, ट्राय, पीएफआरडीए, गुजरात आणि झारखंड यांनी एकत्र येऊन समाजातल्या खालच्या थरातल्या लोकांना अनुदान देण्यासाठी 'आधार कार्ड'च्या वापरास परवानगी द्यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठाकडे केली होती. यावर सुनावणी देताना हा निर्णय दिला. 'आधार कार्ड'ची व्याप्ती  ही अन्नधान्य तसेच एलपीजी गॅसचे अनुदान देण्यापलीकडे वाढवण्यास सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे.  

११ ऑगस्टला 'आधार कार्ड'ची व्याप्ती वाढवण्यास नकार देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा,अशी विनंती करणारी ही याचिका होती. सर्वोच्च न्यायालयानेही आधारची व्याप्ती न वाढवण्याचा आदेश दिला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.