नवी दिल्ली : दिल्लीत 'आप'चे सरकार आहे. भ्रष्टाचाराला पाठिशी घालणार नाही, असे सांगून सत्ते आले. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने दिल्लीच्या पर्यावरण आणि अन्नपुरवठा मंत्री असीम अहमद खान यांची शुक्रवारी मंत्रीपदावरून हकालपट्टी केली.
एका बांधकाम व्यावसायिकाकाडून लाच मागत असल्याची खान यांची ऑडिओ क्लिप खान सोशल मीडियावर फिरत होती. तसेच या मंत्र्यांवरील आरोपांच्या चौकशीअंतर्गत ही क्लिप समोर आली. तिची चौकशी केल्यानंतर खान यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतल्याचे केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे सोपविण्यात आल्याचेही केजरीवाल यांनी जाहीर केले. खान यांची हकालपट्टी केल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर आपचे आमदार इमरान हुसैन यांची नियुक्ती करण्याचाही निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भाजपनेही आता याचप्रमाणे वसुंधरा राजे आणि शिवराजसिंग चौहान यांचीही हकालपट्टी करावी, अशी मागणी केजरीवाल यांनी यावेळी केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.