मी पुन्हा क्रिकेट खेळणार : सचिन तेंडुलकर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा क्रिकेटच्या मैदानात खेळताना दिसणार आहे. सचिनने याबाबत अधिकृतपणे सांगितलेय. त्याने ट्विट केलेय. मी पुन्हा क्रिकेट खेळणार आहे. 

PTI | Updated: Oct 7, 2015, 05:37 PM IST
मी पुन्हा क्रिकेट खेळणार : सचिन तेंडुलकर title=

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा क्रिकेटच्या मैदानात खेळताना दिसणार आहे. सचिनने याबाबत अधिकृतपणे सांगितलेय. त्याने ट्विट केलेय. मी पुन्हा क्रिकेट खेळणार आहे. 

सचिन बरोबरच ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न यांच्यासह  अनेक महान क्रिकेटर नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या टी-२० मॅच खेळणार आहेत. अमेरिकेत क्रिकेटची लोकप्रियता वाढविण्यासाठी दिग्गज निवृत्ती खेळाडूंनी खेळण्याचा निर्णय घेतलाय.

तीन बिग ली बेसबॉल स्टेडिअम्सवर होणाऱ्या सामन्यात जगातील दोन डझनपेक्षा अधिक प्रसिद्ध खेळाडू या सामन्यात खेळणार आहे. वॉल स्ट्रिट जनरलने दिलेल्या बातमीनुसार मॅच सिटी फिल्ड, न्यू यॉर्कमध्ये (७ नोव्हेंबर) मिनट मेड पार्क, ह्युस्टन (११ नोव्हेंबर) आणि लॉस एंजिलीसच्या डोगेर स्टेडिअम (१४ नोव्हेंबर) ला होणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.