टीम इंडियाने खाल्ली माती, स्थान घसरले

भारताला दक्षिण आफ्रिकेबरोबर दोन टी-२० सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने दोन स्थानाने टीम इंडियाचा नंबर खाली गेलाय. त्यामुळे भारत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

PTI | Updated: Oct 8, 2015, 11:07 PM IST
टीम इंडियाने खाल्ली माती, स्थान घसरले title=

मुंबई : भारताला दक्षिण आफ्रिकेबरोबर दोन टी-२० सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने दोन स्थानाने टीम इंडियाचा नंबर खाली गेलाय. त्यामुळे भारत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

टी-२० मालिकेत पहिल्या दोन मॅच हरण्याची किमया टीम इंडियाने केलेय. तिसरा सामना पावसामुळे होऊ शकलेला नाही. त्यामुळे ही मालिका दक्षिण आफ्रिकेने खिशात टाकलली आहे. ही मालिका सुरु होण्याआधी भारत आयसीसी रॅंकींगमध्ये चौथ्या स्थानावर होता. दक्षिण आफ्रिकेने दोन सामने जिंकून आपल्या स्थानात प्रगती केली. सहाव्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर आफ्रिका आली. मात्र, भारताला सहाव्या स्थानावर खाली यावे लागले.

भारताला १११ रेटींग असून सहाव्या तर आफ्रिकेला ११५ रेटींग असून तो पाचव्या स्थानावर आहे. तरी प्रथम क्रमांक श्रीलंकेचा असून १२६ गुण आहेत. पाकिस्तान १२१ गुणांसह दुसऱ्या, ऑस्ट्रेलिया ११८ गुणांसह तिसऱ्या तर वेस्टइंडिज ११७ गुण मिळवून चौथ्या आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.