तेव्हा भारत पाकिस्तानवर हल्ला करणार होता? पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांचा दावा

पाकिस्तानचे माजी विदेश मंत्री खुर्शीद महमूद कसूरी यांना दावा केलाय की, अमेरिकेचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार राहिलेले जॉन मॅक्केन यांच्या नेतृत्वात अमेरिकन प्रतिनिधी मंडळानं मुंबई हल्ल्यानंतर त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी भारत लाहोर जवळील मुर्दिके इथं असलेल्या जमात-उद-दावा आणि लष्कर-ए-तोयबाच्या मुख्यालयावर 'सर्जिकल' हवाई हल्ला करणार होता.

PTI | Updated: Oct 6, 2015, 12:10 PM IST
तेव्हा भारत पाकिस्तानवर हल्ला करणार होता? पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांचा दावा  title=

नवी दिल्ली: पाकिस्तानचे माजी विदेश मंत्री खुर्शीद महमूद कसूरी यांना दावा केलाय की, अमेरिकेचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार राहिलेले जॉन मॅक्केन यांच्या नेतृत्वात अमेरिकन प्रतिनिधी मंडळानं मुंबई हल्ल्यानंतर त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी भारत लाहोर जवळील मुर्दिके इथं असलेल्या जमात-उद-दावा आणि लष्कर-ए-तोयबाच्या मुख्यालयावर 'सर्जिकल' हवाई हल्ला करणार होता.

आणखी वाचा - ISISच्या मुख्यालयावर रशियाचा बॉम्बहल्ला, व्हिडिओ इंटरनेटवर वायरल

एका टिव्ही न्यूज चॅनलच्या कार्यक्रमात कसूरी यांनी सांगितलं की, अमेरिकी प्रतिनिधीमंडळ लाहोरला आलं होतं. त्यात रिपब्लिकन सीनेटर लिंडसे ग्राहम आणि अफगानिस्तान-पाकिस्तानचे अमेरिकेचे विशेष दूत रिचर्ज होलब्रुक पण सहभागी होते. 

आणखी वाचा - पाकिस्तानला भारताचे सडेतोड उत्तर, 'दहशतवाद सोडा आणि चर्चेला बसा'

कसूरी यांनी आपलं पुस्तक 'नायदर ए हॉक, नॉर ए डोव'च्या प्रकाशनापूर्वी सांगितलं की, 'मी तेव्हा विदेश मंत्री नव्हतो. मला एका अमेरिकी राजकीय नेत्याचा फोन आला होता. हे लोक येणार आहे त्यापूर्वी आम्हाला आपल्याशी बोलायचंय.' त्यांनी मॅक्केन यांच्याद्वारे सांगितलं, 'आम्ही भारतातून आलो आहे, तिथं खूप आक्रोश आहे. मुर्दिकेवर हल्ला होऊ शकतो.'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.