10
10
रेल्वेचे तत्काळ तिकीट पुन्हा महागले आहे. १० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत तत्काळ तिकीट दर वाढविण्यात आलेय. ही नवीन दरवाढ २५ डिसेंबर २०१५ पासून अंमलात येण्याची शक्यता आहे. तसे रेल्वेने संकेत दिले आहेत.
३२ वर्ष नौदलात भारताच्या समुद्री सीमांच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडल्यावर आज अखेर आयएनएस गोदावरी ही फ्रीगेट नौदलातून निवृत्त झाली.
आयएएस परीक्षेत नापास झाल्याने एका माथेफिरूने आपल्या आई-वडिलांसह २२ लोकांवर तलवार हल्ला चढविला. हा माथेफिरु तरुण रस्त्याने जाताना प्रत्येकावर हल्ला करत चालला होता.
लहान असताना आपल्या वडिलांना ज्यांनी मारले त्यांचा बदला मुलाने १२ वर्षांनी घेतला. त्याचे नाव आहे आलम खान. ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली.
एका न्यायालयीन प्रकरणाचं काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलाय.
डीएसके मोटोव्हील्स आणि इटलीची सुपरबाईक ब्रँड बेनेलीने शुक्रवारी नवी बाईक लाँच केलीय. २५० सीसीची डीएसके बेनेली टीएनटी २५ या बाईकची किंमत १.६८ लाख रुपये आहे.
सीबीआयने येथील मुख्यमंत्री कार्यालयावर छापा टाकल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अधिक आक्रमक झालेत. त्यांनी थेट केंद्रातील नरेंद्र मोदी सरकावर टीका केलेय. विरोधकांना संपविण्यासाठी सीबीआयकडे काम सोपविल्याचा आरोप केजरीवाल यांनी केलाय. त्यामुळे आता 'आप' आणि केंद्र सरकारमधील संघर्ष टोकाला पोहोचलाय.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी आता दिल्लीत नवं राजकीय अटकनाट्य रंगण्याची नांदी काँग्रेसच्या सूत्रांनी दिलीय. येत्या १९ तारखेला सोनिया आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी पतियाला हाऊस कोर्टासमोर हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलंय. दरम्यान, त्यांनी जेलमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आप' खासदार भगवंत मान यांना पिण्यासाठी दिले. दिल्लीतील मुख्यमंत्री सचिवालयात सीबीआयने मारलेल्या छाप्यानंतर 'आप' खासदार आक्रमक झालेत. त्यावेळी भगवंत मान घोषणा देत होते. त्यांना यावेळी अस्वस्थ वाटू लागल्याने मोदींनी त्यांना पाणी दिले.
यंदा प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. तुम्ही सातत्यानं सहभागी होताय, यंदा इतर राज्यांना सहभागी होऊ द्या असं कारण सांगत पंतप्रधान कार्यालयानं महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारला.