10
10
अमेरिकेला ई-मेलवरून धमकी मिळाल्यानंतर खबरदारी म्हणून एक हजाराहून अधिक शाळा बंद केल्या आहेत.
समाजवादी पक्षाचे आझम खान यांनी पुन्हा एकदा बडबड केलेय. त्यांनी नरेंद्र मोदींपेक्षा आपणच देशात सध्या पंतप्रधानपदासाठी मी योग्य व्यक्ती असल्याचा दावा केलाय.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सचिवालय कार्यालयावर आज सकाळी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी छापा टाकला. त्यांचे कार्यालय सील केलेय.
धुक्यामुळे उशिराने धावत असलेल्या रेल्वेमधील बाळाला भूख लागली. मात्र, त्याला दुधाची गरज होती. याबाबत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना याबाबत ट्विट करण्यात आले. रेल्वेमंत्र्यांनी याची दखल घेत फतेहपूर जिल्ह्यात दुधाची व्यवस्था केली. तसेच कानपूर येथे रेल्वे पोहोचल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी पाच वर्षांच्या बाळाला दूध आणि बिस्कीट उपलब्ध करुन दिले.
पश्चिम दिल्लीत पुन्हा निभर्याची पुनरावृत्ती घडलेय. एका १४ वर्षीय मुलीचे अपहरण करुन सहा नराधमांनी धावत्या गाडीत सामूहिक बलात्कार केला. ही घटना रानहोलामध्ये घडलेय.
ISIS (इसिस) या दहशतवादी संघटनेचा आर्थिक डोळारा सांभाळणारा प्रमुख अबू सालेह हा हवाई हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकेने या वृत्तास दुजोरा दिला आहे.
जर मला माफीचा साक्षीदार बनवला तर मी मुंबईतील २६/११च्या हल्ल्याची सर्व माहिती देईन, अशी कबुली डेव्हिड कोलमन हेडली यांने दिलेय.
फ्रान्समधील पॅरिसवर हल्ला केल्यानंतर रशियाने आक्रमक पवित्रा घेतला आणि रॉकेट, बॉम्ब हल्ले चढविले. आता रशियानंतर जर्मनी लष्करी कारवाई करण्याच्या विचारात आहे. तसा प्रस्ताव संसदेत पारित करण्यात आलाय.
समाजवादी पार्टीने काँग्रेसला 'ऑफर' देऊ केली आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी अट लागू केलेय. जर मुलामयसिंह यादव यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यास काँग्रेस तयार असेल तर आम्ही त्यांच्याशी आघाडी करु, असे असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले आहे.
नवी दिल्ली : देशात जीएसटी लागू करण्याबाबत नेमलेल्या मुख्य आर्थिक सल्लागारांच्या समितीने आपला अहवाल केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे सादर केला. दरम्यान, काँग्रेसने सहकार्य केले तर जीएसटी लागू होण्याचा मार्ग मोकळा होणार नाही.