पुणे : डीएसके मोटोव्हील्स आणि इटलीची सुपरबाईक ब्रँड बेनेलीने शुक्रवारी नवी बाईक लाँच केलीय. २५० सीसीची डीएसके बेनेली टीएनटी २५ या बाईकची किंमत १.६८ लाख रुपये आहे.
या बाईकच्या रुपाने भारतात सुपर बाईकिंगची संस्कृती रुजवण्याची संकल्पना असल्याचे डीएसके मोटोव्हील्सचे अध्यक्ष शिरीष कुलकर्णी यांनी सांगितले.
या बाईकचा लुक जबदस्त आहे. त्यामुळे बाईकप्रेमींना ही बाईक नक्कीच आवडेल. २४९ सीसीचे इंजिन देण्यात आलेय. ही बाईक पांढरा आणि लाल या दोन रंगात उपलब्ध आहे.