10

चेन्नईची मोदींकडून हवाई पाहाणी, एक हजार कोटींची मदत

मुसळधार पावसाने तामिळनाडूला जोरदार झोडपून काढले. पावसाने होत्याचे नव्हते केले. कित्येक कोटींचे पावसामुळे नुकसान झाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नई आणि परिसराची हवाई पाहाणी  केली. त्यानंतर मोदी यांनी एक हजार कोंटीची तातडीची मदत जाहीर केली.

आता रेल्वे आरक्षण रद्द करण्याच्या नियमांत बदल

रेल्वेने प्रवाशांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. आता रेल्वे बोर्डाने आरक्षण रद्द करण्याच्या नियमांत बदल केला असून प्रवाशांना तिकिट रद्द अनारक्षित खिडकीवरही करता येणार आहे.

आता कर्मचारी कंपनीच्या परवानगी शिवाय आपला PF काढू शकतात!

भविष्यनिर्वाह निधीच्या (PF) रकमेसाठी आता कंपनीच्या अनुमतीची गरज भासणार नाही. नव्या नियमांनुसार, भविष्यनिर्वाह निधीच्या रकमेसाठी थेट भविष्यनिर्वाह निधी संस्था अर्थात ईपीएफओकडे अर्ज करता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला PFचे पैसे सहज उपलब्ध होऊ शकतात.

चेन्नईमध्ये पावसाचा धुमाकूळ, अनेक रेल्वे गाड्या रद्द काही दुसऱ्या मार्गाने

शहरात मंगळवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा तडाखा बसल्याने रेल्वेसह विमान सेवेवर परिणाम झालाय. अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून काहींचे मार्ग बदलण्यात आलेत. तर विमान सेवा खंडीत करण्यात आली आहे.

मोदी कपडे धुण्यासाठी भारतात येतात : यादव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. आता त्यात भर पडली आहे राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव याचं पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची. मोदी कपडे धुण्यासाठी भारतात येतात, अशी खरमरीत टीका केली. 

दिल्लीतील आमदारांना मिळणार घसघसीत पगारवाढ, प्रस्तावाला मान्यता

दिल्लीतील आमदारांची पगारवाड होणार आहे. आमदारांचे वेतन आणि भत्ते वाढवण्याच्या प्रस्तावाला दिल्ली राज्य सरकारनं शुक्रवारी मंजुरी दिली. मुख्यमंत्री अरविंद केरजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

असहिष्णुता : आमिरच्या विधानावर अभिनेत्री नगमा म्हणाली, कोणता डोंगर कोसळलाय देशावर?

अभिनेत्री आणि काँग्रेस सदस्य नगमा आज वाढती असहिष्णुतावर आमिर खानच्या वक्तव्यावर समर्थन करण्यासाठी पुढे सरसावली. सुपरस्टारने भारत सोडण्याचा कधी विचार केलेला नाही. नगमाने योगी आदित्यनाथ या  भाजप नेत्यांच्या टीकेवर जोरदार हल्लाबोल करत समाचार घेतला.

हरियाणाच्या मंत्र्याने महिला एसपीला म्हटले, गेट आऊट, उत्तर मिळाले 'जाणार नाही'

हरिणायाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांना एका बैठकीतून नाराज होऊन जावे लागले. कारण की, महिला जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्यांना कडक भाषेत उत्तर दिले. आरोग्य मंत्र्यांनी या महिला पोलीस अधिकाऱ्याला गेट आऊट म्हटले. त्यावर महिला पोलीस अधिकाऱ्यांनी जाणार नाही, असे स्पष्ट बजावले. 

'मुस्लिम पर्सनल लॉ'त सुधारणा करा, मोदींना मुस्लिम महिलांचे पत्र

भारतातील मुस्लिम महिला आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. मुस्लिम पर्सनल लॉमध्ये सुधारणा करण्याची विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली आहे.

अल्पवयीन शालेय मैत्रिणीवर मित्रासह तिघांकडून गॅंगरेप, व्हिडिओ व्हाट्सअॅपवर केला व्हायरल

एका अल्पवयीन मुलीवर तिच्या मित्रासह अन्य तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बलात्कार झाल्यानंतर पीडित मुलीचा व्हिडिओ व्हाट्सअॅपवर व्हायरल करण्यात आला. मुलीच्या काकीला या व्हिडिओची क्लिप व्हाट्सअॅपवर मिळाल्यानंतर ही घटना उघडकीस आली.