नॅशनल हेराल्ड प्रकरण : सोनिया, राहुल गांधी यांना समन्स

नॅशनल हेराल्ड प्रकरणी आता दिल्लीत नवं राजकीय अटकनाट्य रंगण्याची नांदी काँग्रेसच्या सूत्रांनी दिलीय. येत्या १९ तारखेला सोनिया आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी पतियाला हाऊस कोर्टासमोर हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलंय. दरम्यान, त्यांनी जेलमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

PTI | Updated: Dec 17, 2015, 02:53 PM IST
नॅशनल हेराल्ड प्रकरण : सोनिया, राहुल गांधी यांना समन्स title=

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी आता दिल्लीत नवं राजकीय अटकनाट्य रंगण्याची नांदी काँग्रेसच्या सूत्रांनी दिलीय. येत्या १९ तारखेला सोनिया आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी पतियाला हाऊस कोर्टासमोर हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलंय. दरम्यान, त्यांनी जेलमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

यादिवशी दोन्ही नेते कोर्टासमोर हजर राहतील. मात्र कोर्टानं जर जामीन घेण्यास सांगितलं, तर काँग्रेस अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्यासाठी अर्ज करणार नाही, असे संकेत पक्षातल्या सूत्रांनी दिलीय. त्यामुळे येत्या १९ तारखेला राजधानीत होणाऱ्या कोर्टाच्या सुनावणीकडे सगळ्याचं लक्ष आहे.