10

फेसबूकवर पोस्ट करणाऱ्या महिला पत्रकाराला ऑनलाइन धमकी

फेसबूकवर पोस्ट करणाऱ्या महिला पत्रकाराला ऑनलाइन धमकी देण्यात आली आहे. केरळमध्ये मदरशांमध्ये युवक आणि युवतींचे लैंगिक शोषण होत असल्याचा गौप्यस्फोट मुस्लिम महिला पत्रकाराने फेसबूकवर केला होता. 

आप आमदार अखिलेश त्रिपाठी यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक

 आम आदमी पार्टीचे आमदार अखिलेश त्रिपाठी यांना दिल्ली पोलिसांनी अटक केल्याने आपला राजकीय हादरा बसलाय.

सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर साधला निशाणा, संविधान आदर्शांवर घाला

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकावर जोरदार हल्लाबोल केला. देशातील अहिष्णूतेवर त्यांनी भाष्य केले. संविधानात ज्या आदर्शांनी आम्हाला प्रेरित केले. त्याच आदर्शांवर घाला घालण्याचे काम करण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

असादुद्दीन ओवसी भडकलेत, आमिर नॉनसेंस बोलत आहे!

देशात असहिष्णुता वाढत असल्याचा आरोप करत अनेकांनी विरोध करताना आपले पुरस्कार परत केले. विरोधकांनी भाजप सरकारला धारेवर धरले. यात भर घातली ती आमिर खानच्या वक्तव्याने. पत्नी किरण राव म्हणते देश सोडून जाऊया, असे आमिरने सांगितले. यावर चौहोबाजुने टीका झाली. आता एमआयएमचे अध्यक्ष असादुद्दीन ओवसी भडकलेत. ते म्हणालेत, आमिर नॉनसेंस बोलत आहे!

आमिरची पत्नी तालिबानात राहणार आहे का?, भाजपचे नेते साक्षी भडकलेत

अभिनेता आमिर खानने वादग्रस्त विधान केल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. भाजपचे नेते आणि खासदार साक्षी महाराज हे आमिर खानवर भडकलेत. त्यांनी म्हटलेय आमिरची पत्नी किरण रावला तालिबानमध्ये राहायचे आहे का?

केजरीवाल यांची पलटी, लालूच गळ्यात पडलेत

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यात राजद  प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या गळाभेटीवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अखेर मौन सोडलेय. या भेटीनंतर त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता. लालूच माझ्या गळ्यात पडलेत, असे केजरीवाल म्हणालेत.

सातवा वेतन आयोग, ...तर कर्मचाऱ्यांना वेतनवाढ नाही!

केंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोगाची गूड न्यूज दिली असताना आता काम चुकारपणा करणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ मिळणार नाही, असे स्पष्ट केलेय. याबाबतची शिफारस या आयोगात करण्यात आलेय.

भारताचा तिरंगा उलटा, तो फोटो चुकीचा पंतप्रधान कार्यालय

भारतीय तिरंग्याचा सोशल मीडियावर फिरत असलेला फोटो चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आले आहे. भारताचा तिरंगा उलटा लटकवलेला असल्याचा फोटो एएनआयने ट्विटवर अपलोट केला होता.

आशियाई परिषदेवरही दहशतवादी हल्ल्याचे सावट

मलेशिया आणि आणि सिंगापूर दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मलेशियाची राजधानी क्वालालंम्पूरमध्ये दाखल झालेत. या ठिकाणी होणा-या आशियाई परिषदेवरही दहशतवादाचे सावट आहे. महिला आत्मघाती हल्ला होण्याची शक्यता आहे.

२१वे शतक हे आशियाचे : नरेंद्र मोदी

 भारत आणि आसिआन हे नैसर्गिक भागीदार आहेत. तसेच २१वे शतक हे आशियाचे आहे. आता आपल्याला बदलासाठी सुधारणा करायची आहे, असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वालालांपूर येथील आसिआन शिखर संमेलनात केले.