मोदी कार्यालयाने अडवला महाराष्ट्राचा चित्ररथ

यंदा प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. तुम्ही सातत्यानं सहभागी होताय, यंदा इतर राज्यांना सहभागी होऊ द्या असं कारण सांगत पंतप्रधान कार्यालयानं महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारला.

PTI | Updated: Dec 16, 2015, 03:40 PM IST
मोदी कार्यालयाने अडवला महाराष्ट्राचा चित्ररथ title=

नवी दिल्ली : यंदा प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. तुम्ही सातत्यानं सहभागी होताय, यंदा इतर राज्यांना सहभागी होऊ द्या असं कारण सांगत पंतप्रधान कार्यालयानं महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारला.

राज्यानं यंदा जागरण-गोंधळ, अशी थीम दिली होती. गेल्या वर्षीपर्यंत संरक्षण मंत्रालयाकडे याचे अधिकार होते. यंदापासून पंतप्रधान कार्यालय चित्ररथाच्या थिम देणार आहे. मात्र महाराष्ट्राला PMOनं थिम दिलेलीच नाही.

पंतप्रधान कार्यालयाच्या हस्तक्षेपामुळे गेल्या वर्षी पहिलं पारितोषिक पटकावणाऱ्या महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा राजपथावर दिसणारच नाही, अशी शक्यता आहे.