नवी दिल्ली : सीबीआयने येथील मुख्यमंत्री कार्यालयावर छापा टाकल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अधिक आक्रमक झालेत. त्यांनी थेट केंद्रातील नरेंद्र मोदी सरकावर टीका केलेय. विरोधकांना संपविण्यासाठी सीबीआयकडे काम सोपविल्याचा आरोप केजरीवाल यांनी केलाय. त्यामुळे आता 'आप' आणि केंद्र सरकारमधील संघर्ष टोकाला पोहोचलाय.
सीबीआयचा छापा पडल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकार विरोधात मोठी आघाडीच उघडली आहे. मोदी सरकारने विरोधकांना संपविण्याचे आदेश सीबीआयला दिल्याचा नवा आरोप केजरीवाल यांनी केलाय.
सीबीआयला विरोधी पक्षांना लक्ष करण्याचे काम मोदी सरकारने दिले आहे आणि जे ऐकणार नाहीत त्यांना संपविण्याचे आदेश केंद्राकडून देण्यात आल्याचे कालच एका अधिकाऱ्याने मला सांगितले, असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.
प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर सीबीआयने छापे मारल्यानंतर ‘आप’ केंद्र सरकार विरोधात आक्रमक झाला आहे. केजरीवालांनी याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भ्याड, मनोरुग्ण म्हटले होते. त्यानंतर गुरुवारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत केजरीवाल यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना लक्ष केले.
A CBI officer told me yest that CBI has been asked to target all opp parties n finish those who don't fall in line https://t.co/CU5FoTtPq5
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 18, 2015