10
10
भारतीय जनता पक्षातून आता अटल, अडवाणी आणि जोशी युगाचा पूर्णपणे अंत झाला झाला. याचा पुरावा ही अमित शहा यांची नवी टीम आहे. या तिघांना संसदीय समितीतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.
इबोला प्रभावित लायबेरियाहून आज सकाळी नवी दिल्लीत पोहोचलेल्या तीन भारतीय नागरिकांना सर्वांपासून दूर ठेवून त्यांना तपासणीसाठी नेण्यात आलंय. लायबेरियाहून आज तब्बल 112 भारतीय देशात परत येतायेत. त्याच पार्श्वभूमिवर मुंबई आणि दिल्ली विमानतळांना अलर्ट करण्यात आलंय.
सुप्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शक आणि अभिनेते रिचर्ड अँटनबरो यांचं निधन झालंय. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी लंडनमध्ये अखेरचा श्वास घेतला.
१४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला एका पंचायतीने पाच वेळा श्रीमुखात लगावण्याची शिक्षा ठोठावली आहे. पंचायतीच्या या निर्णयाचा सर्वस्तरातून विरोध होत असून प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त झळकल्यावर पोलिसांना जाग आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
तरुणीचा फोटो अश्लील बनवून सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट केल्याच्या आरोपावरून एका २० वर्षीय तरूणाला अटक केली आहे.
इजिप्तमधील दक्षिण सिनाई भागातील शर्म अल शेख या रिसॉर्टजवळील महामार्गावर दोन पर्यटन प्रवासी बसची धडक लागून लागलेल्या आगीत 33 प्रवाशी जळून खाक झालेत. तर 41 प्रवासी जखमी झाले आहेत. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये परदेशी नागरिकांचा समावेश आहे.
गॉड्स ओन कंट्री... म्हणजे देवभूमी असं ज्या केरळ प्रदेशाचं वर्णन केलं जातं, तिथं पुढच्या 10 वर्षांत टप्प्याटप्प्यानं दारूबंदी केली जाणार आहे... केरळमधील युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंट सरकारनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय.
तेलंगणमधील जनतेची सामाजिक आणि आर्थिक स्थितीच्या पाहणीसाठी करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणावरून वाद सुरू असताना तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी या निर्णयाचं समर्थन करत 'अन्याय' रोखण्यासाठी आपण 'हिटलर' बनू शकतो, असं वक्तव्य केलं.
पाकिस्तानात इमरान खानवर हल्ला झालाय. स्वतंत्रता परेड दरम्यान गुजरनवाला इथं हा हल्ला झालाय. इमरान खान हा तहरीक-ए-इंसाफचा प्रमुख असून पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन आहे.
न्यूझीलंडचे महान बॅट्समन मार्टिन क्रो यांनी इंग्लंडमध्ये सध्या सुरू असलेल्या टेस्ट क्रिकेट सीरिजमध्ये महेंद्र सिंह धोनीच्या कॅप्टन्सीवर टीका केलीय. धोनीकडून टेस्टची कॅप्टन्सी काढून घ्यावी, असंही क्रो म्हणालेत.