केरळमध्ये आता कायमचा 'ड्राय डे'! 700 बार होणार बंद

गॉड्स ओन कंट्री... म्हणजे देवभूमी असं ज्या केरळ प्रदेशाचं वर्णन केलं जातं, तिथं पुढच्या 10 वर्षांत टप्प्याटप्प्यानं दारूबंदी केली जाणार आहे... केरळमधील युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंट सरकारनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. 

PTI | Updated: Aug 22, 2014, 02:08 PM IST
केरळमध्ये आता कायमचा 'ड्राय डे'! 700 बार होणार बंद title=

तिरुवनंतपुरम: गॉड्स ओन कंट्री... म्हणजे देवभूमी असं ज्या केरळ प्रदेशाचं वर्णन केलं जातं, तिथं पुढच्या 10 वर्षांत टप्प्याटप्प्यानं दारूबंदी केली जाणार आहे... केरळमधील युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंट सरकारनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. 

केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत केरळ राज्य दारूमुक्त करण्याच्या दृष्टीनं ही पावलं उचलण्यात आली. विशेष म्हणजे केरळमध्ये आजमितीला देशात सर्वाधिक दारूसेवन केलं जातं. उत्पादन शुल्काच्या माध्यमातून वर्षाला तब्बल 8 हजार कोटी रूपयांचं उत्पन्न केरळ सरकारला मिळतं. 

मात्र दारूमुक्तीसाठी या उत्पन्नावर पाणी सोडण्याची तयारी केरळ सरकारनं दाखवलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.