इबोला: दिल्लीत लायबेरियाहून आलेल्या 3 भारतीयांची तपासणी

इबोला प्रभावित लायबेरियाहून आज सकाळी नवी दिल्लीत पोहोचलेल्या तीन भारतीय नागरिकांना सर्वांपासून दूर ठेवून त्यांना तपासणीसाठी नेण्यात आलंय. लायबेरियाहून आज तब्बल 112 भारतीय देशात परत येतायेत. त्याच पार्श्वभूमिवर मुंबई आणि दिल्ली विमानतळांना अलर्ट करण्यात आलंय.  

PTI | Updated: Aug 26, 2014, 01:28 PM IST
इबोला: दिल्लीत लायबेरियाहून आलेल्या 3 भारतीयांची तपासणी title=

नवी दिल्ली: इबोला प्रभावित लायबेरियाहून आज सकाळी नवी दिल्लीत पोहोचलेल्या तीन भारतीय नागरिकांना सर्वांपासून दूर ठेवून त्यांना तपासणीसाठी नेण्यात आलंय. लायबेरियाहून आज तब्बल 112 भारतीय देशात परत येतायेत. त्याच पार्श्वभूमिवर मुंबई आणि दिल्ली विमानतळांना अलर्ट करण्यात आलंय.  

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एमआयएएल)कडून हे स्पष्ट करण्यात आलंय की, ‘विमान छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचताच त्याला वेगळं ठेवलं जाईल आणि सर्व प्रवाशांची तपासणी केली जाईल.’

एमआयएएलच्या मते ज्या प्रवाशांमध्ये आजाराची लक्षणं दिसणार नाहीत त्यांना इमिग्रेशनसाठी टर्मिनलकडे पाठवलं जाईल. तर लायबेरियाहून आलेल्या प्रवाशांमध्ये जर इव्हीडीचे लक्षणं आढळले तर त्यांना सरळ अॅम्बुलन्सनं विशेष हॉस्पिटलमध्ये पाठवलं जाणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.