10
10
केंद्र सरकारनं सुप्रिम कोर्टात विचाराधिन असलेल्या ‘सेतु समुद्रम’च्या मुद्द्यावर आज जोरदार मत मांडलंय. कोणत्याही परिस्थितीत राम सेतु तोडला जाणार नाही, असं रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरींनी लोकसभेत स्पष्ट केलंय.
अमेरिकेत नऊ वर्षाच्या एका शूर मुलानं नऊ फुट मगरीसोबत लढा दिला आणि स्वत:ला मगरीच्या तोंडातून मुक्त केलं.
स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देऊन गौरविलं जाणार असल्याच्या चर्चेचं पेव फुटलं असताना खुद्द नेताजींच्या नातेवाईकांनी मात्र या चर्चेत स्वारस्य दाखविण्याऐवजी आधी नेताजींच्या बेपत्ता होण्यामागचं रहस्य शोधण्याचं आवाहन केलं आहे़
‘भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार’ असं बिरूद मिरविणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या नावावर अनेक कौतुकास्पद रेकॉर्ड असले तरी, सध्या त्याची वाटचाल एका नामुष्कीजनक रेकॉर्डकडे सुरू आहे.
लोकसभेत भाजपच्या यशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमित शहांना ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार दिला असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं यामताशी असहमतीच दर्शवली आहे.
अभिनेता अजय देवगणनं बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीच द्यायला हवी, अशी मागणी केलीय. बलात्कार करणं म्हणजे हत्या करण्यापेक्षाही मोठा अपराध असल्याचं तो म्हणाला.
मँचेस्टर टेस्टमध्ये टीम इंडियाचा इंग्लंडनं धुव्वा उडवलाय. तीन दिवसातच टीम इंडियाचा इंग्लंडनं एक इनिंग आणि 54 रन्सनी दारुण केलाय. टीम इंडियाचे शेर तीन दिवसात ढेर झाले. या पराभवामुळे सीरिजमध्ये भारत 2-1 ने पिछाडीवर आहे.
उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील परीक्षितगड क्षेत्रातील एक गावातील दोन युवकांनी एका तरुणीचे अपहरण करून तिच्यावर कथित तीन दिवस गँगरेप केला आणि अश्लिल क्लिप बनवली. पोलिसांनी तरुणीचा शोध लावून एका आरोपीला अटक केली आहे.
शाळेचं शुल्क, वीज, पाणी बिल एकाच यंत्रणेच्या माध्यमातून भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं ‘कुठेही, कधीही’ बिल भरणा व्यवस्थेचा प्रस्ताव मांडला आहे.
नवी दिल्ली- कोलकाता राजधानी एक्सप्रेसमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात झूरळ आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी राबवलेल्या विशेष मोहीमेत ही गंभीर बाब समोर आली असून या निष्काळजीपणासाठी रेल्वेने गाडीत कॅटरिंग सुविधा देणाऱ्या इंडियन कॅटरिंग आणि टूरिझम कॉर्पोरेशनवर (आयआरसीटीसी) कारवाईचा बडगाही उगारला आहे.