10
10
देशातील सर्वात मोठी ऑनलाइन इ-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट डॉट कॉमनं सोमवारी बंपर सेल ‘The Big Billion Day’लाँच केली होती. मात्र लॉन्चिंग नंतर काही वेळातच फ्लिपकार्टची साइट क्रॅश झाली. ज्यामुळं ग्राहकांना खूप त्रास सहन करावा लागला.
जम्मूतील तंगधार सेक्टर इथं भारतीय सैन्यानं तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असतांना सुरक्षा दलांच्या जवानांशी चकमक झाली. यावेळी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय.
आम आदमी पक्षाचेचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्या मुलीच्या विरोधात एका व्यक्तीनं तिच्याच फेसबुकवरील फोटोवर अश्लील कमेंट केलीय. या कमेंटमुळं नाराज झालेल्या आपच्या कार्यकर्त्यांनी गाजियाबादमध्ये तक्रार दाखल केली. मात्र केजरीवाल यांनी या घटनेला जास्त हवा न देता अश्लील कमेंट करणाऱ्या व्यक्तीला माफ करण्याची मागणी केलीय.
सभेनंतर मैदानातील कचरा उचलण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वारंवार केलं जात असतानाच मुंबईतील महालक्ष्मी इथं झालेल्या सभेत भाजप कार्यकर्त्यांनी या आवाहनाकडं दुर्लक्षच केलं आहे. सभेनंतर मैदानात सर्वत्र कचरा पडून होता. अखेरीस रविवारी सकाळी शिवसेनेनं मैदानात स्वच्छता मोहीम राबवून भाजपवर कुरघोडी केली आहे.
सीमारेषेवर पाकिस्तान सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असतानाच पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी शस्त्रसंधींच्या उल्लंघनासाठी भारतालाच जबबादार ठरवलं आहे. भारतानं पाकिस्तानच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, असं मुशर्रफ यांनी म्हटलंय. तर मुशर्रफ यांना सध्या पाकिस्तानमध्येच कोणी गांभीर्यानं घेत नसल्यानं त्यांच्या विधानावर प्रतिक्रीया देणार नाही असा सणसणीत टोला भारताचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लगावला आहे.
बिहारची राजधानी पाटण्यात मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये 32 जणांचा मृत्यू, तर तब्बल शंभरहून अधिक नागरिक जखमी आहेत. याबाबतचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक कादर खान आपली दोन मुलं आणि पत्नीसह हज साठी मक्का इथं पोहोचलेत.
भारताच्या सानिया मिर्झा आणि साकेत मायनेनी जोडीनं आशियाई क्रीडा स्पर्धेतील टेनिसच्या मिश्र दुहेरीत गोल्ड मेडल जिंकलंय. त्यांच्या या सुवर्णयशानं भारताची टेनिस प्रकारातील मोहीम यशस्वी ठरली. इंचिऑन आशियाईमध्ये भारतानं टेनिसमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन ब्राँझपदकांची कमाई केली.
संयुक्त राष्ट्राच्या महासभेत दहशवादाच्या सावटाखाली पाकशी चर्चा करता येणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला सुनावल्यानंतर पाकनं अखेरीस नमती भूमिका घेतली आहे. भारत - पाकमधील सचिव स्तराची बैठक होत असतानाच काश्मीरमधील हुर्रियतच्या नेत्यांशी चर्चा करण्याची वेळ चुकलीच अशी कबुली पाकिस्तानचे सुरक्षा आणि परराष्ट्र सल्लागार सरताज अझीझ यांनी दिली आहे.
एशियन गेम्स स्पर्धेत भारतीय तिरंदाजी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत पुरुष सांघिक कंपाउंड प्रकारात सुवर्णपदक पटकाविले आहे. भारतीय संघाने यजमान दक्षिण कोरिया संघाचा 227-224 असा पराभव केला.