धोनीकडून टेस्टची कॅप्टन्सी काढून घ्यावी: मार्टिन क्रो

न्यूझीलंडचे महान बॅट्समन मार्टिन क्रो यांनी इंग्लंडमध्ये सध्या सुरू असलेल्या टेस्ट क्रिकेट सीरिजमध्ये महेंद्र सिंह धोनीच्या कॅप्टन्सीवर टीका केलीय. धोनीकडून टेस्टची कॅप्टन्सी काढून घ्यावी, असंही क्रो म्हणालेत. 

PTI | Updated: Aug 14, 2014, 09:02 PM IST
धोनीकडून टेस्टची कॅप्टन्सी काढून घ्यावी: मार्टिन क्रो title=

वेलिंग्टन: न्यूझीलंडचे महान बॅट्समन मार्टिन क्रो यांनी इंग्लंडमध्ये सध्या सुरू असलेल्या टेस्ट क्रिकेट सीरिजमध्ये महेंद्र सिंह धोनीच्या कॅप्टन्सीवर टीका केलीय. धोनीकडून टेस्टची कॅप्टन्सी काढून घ्यावी, असंही क्रो म्हणालेत. 

‘क्रिक इंफो’मध्ये क्रो यांनी लेख लिहिलाय, ते म्हणाले, “जर धोनी टेस्ट क्रिकेटच्या कॅप्टन्सीतून बाहेर पडेल तर भारताला त्याच्या विचित्र रणनितींची कमी जाणवेल. त्यासाठी निवडकर्त्यांना योग्य असा कॅप्टनही शोधावा लागेल.” ते पुढं लिहितात, मॅचमध्ये विकेट किपर आणि कॅप्टन म्हणून काम करतांना धोनी कधी-कधी विचित्र निर्णय घेतो. ते कधी योग्यही ठरतात. पण सध्या इंग्लंड दौऱ्यात भारत टेस्ट सीरिजमध्ये 1-2नं पिछाडीवर आहे. शेवटच्या टेस्टमध्ये बरोबरी न केल्यास परदेशात आणखी एक सीरिज गमावण्याच्या परिस्थितीत टीम इंडिया आहे. धोनी आता स्टिफन फ्लेमिंग आणि ब्रायन लाराच्या परदेशात मिळालेल्या पराभवाचा रेकॉर्ड तोडण्यापासून तीन मॅच दूर आहे. 

न्यूझीलंडचे माजी कॅप्टन क्रो म्हणाले, धोनीची रणनिती फक्त ठराविक ओव्हरच्या क्रिकेट प्रमाणे आहे आणि त्यानं टेस्टवर लक्ष देण्यापेक्षा पुढील वर्षी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची पत कायम राखण्यावर लक्ष दिलं पाहिजे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.