10

मंगळयानावर कोणत्या सोपवण्यात आल्यात जबाबदाऱ्या

भारताचा मंगळयान जेव्हा मंगळाभोवती फिरुलागेल तेव्हा तो आपलं काम सुरु करेल. या मंगळयानावर कोणत्या जबाबदा-या सोपवण्यात आल्यात? त्यावर कोणत्या प्रकारची हायटेक यंत्रणा लावण्यात आलीये, याबाबत माहिती.

चीन सैन्याने प्रादेशिक युद्धास सज्ज राहावे - जिनपिंग

चीन सैन्याने  भारतीय हद्दीत घुसखोरी केली असताना भारताने तीव्र निषेध केला. ही घुसखोरी मागे घेण्याऐवजी चीनने आपल्या सैनिकांना युद्धास तयार राहावे आणि आदेशाचे सक्तीने पालन करावे, असे आदेश चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिलेत. 

छातीत दुखत असल्यानं शशी कपूर हॉस्पिटलमध्ये भर्ती

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शशी कपूर यांना छातीत दुखू लागल्यानं मुंबईतल्या कोकीळाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलंय. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय. त्यांचे आप्तेष्ट आणि फॅन्स त्यांची प्रकृती लवकर सुधारावी याची प्रार्थना करतायेत. 

आम आदमी पक्षाचे नेते मयांक गांधींवर गुन्हा

आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मयांक गांधी यांच्यासह एकूण सहा कार्यकर्त्यांविरोधात ओशिवरा पोलिसांनी विनयभंग आणि धमकीचा गुन्हा नोंदविला. त्यात एका महिलेचाही सहभाग आहे. पोलीस प्रवक्ते उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी या वृत्तास दुजोरा दिला. 

‘केबीसी’ला मिळाली पहिली ७ कोटी विजेती जोडी

अनेकांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात पहिल्यांदाच एका जोडीनं सात कोटी रुपये जिंकलेत. दिल्लीचे नरुला बंधु केबीसीचे पहिले-वहिले सात कोटी रुपयांचे विजेते ठरले आहेत. 

काश्मीर हा पाकिस्तानचा भाग, इंच इंच जमीन आणणार - बिलावल

पाकिस्तान पिपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो याने नविन वाद उभा केलाय. भारतातील काश्मीर हा पाकिस्तानचा भाग आहे. काश्मीरमधील एक एक इंच जमीन पुन्हा मिळविली जाईल, असे वादग्रस्त वक्तव्य केलेय.

शी जिनपिंग यांचे नावात केला घोळ, अँकरने गमावली नोकरी

भारत दौऱ्यावर आलेले चीनचे राष्ट्पती शी जिनपिंग यांचे नाव उच्चारण्यात चूक केल्यामुळे दूरदर्शनच्या वृत्तनिवेदकाला आपली नोकरी गमवावी लागली.

जेवण बनवायला नकार दिल्यानं पतीनं पत्नीला अॅसिडनं जाळलं

जिल्ह्याच्या गोहपारू पोलीस स्टेशनमध्ये खन्नोधी गावातील एक धक्कादायक घटना पुढे आलीय. एका व्यक्तीनं पत्नीनं जेवण बनवण्यास नकार दिल्यानं चिडून अॅसिड टाकून जाळलं. 

मदरसांमध्ये दिले जातात दहशतवादाचे धडे - साक्षी महाराज

भाजप खासदार योगी आदित्यनाथ यांच्यापाठोपाठ उत्तरप्रदेशमधील उन्नाव इथले खासदार साक्षी महाराज यांनीदेखील नवीन वाद निर्माण केला आहे. मदरसांमध्ये राष्ट्रप्रेमाऐवजी फक्त दहशतवादाचेच धडे दिले जातात, असं विधान साक्षी महाराज यांनी केलंय. 

मलालावर हल्ला करणारे पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात

मुलींना शिक्षणाची दारे उघडण्यासाठी आणि त्यांना शिक्षण मिळावे यासाठी धडपडणाऱ्या युवा कार्यकर्ती मलाला यूसुफाजाई हिच्यावर 10 तालिबानी अतिरेक्यांनी हल्ला केला होता. तिला देशाबाहेर संरक्षण घ्यावे लागले होते. जगात मलाला हिच्या धाडसाचे कौतुक केल्याने पाकिस्तानची मान खाली गेली. पाकिस्तानी सैन्याने शहापणा दाखवत हल्लेखोर अतिरेक्यांना ताब्यात घेतले आहे.