धक्कादायक: बलात्काराची शिक्षा, नराधमाला फक्त पाच फटके

१४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला एका पंचायतीने पाच वेळा श्रीमुखात लगावण्याची शिक्षा ठोठावली आहे. पंचायतीच्या या निर्णयाचा सर्वस्तरातून विरोध होत असून प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त झळकल्यावर पोलिसांना जाग आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

PTI | Updated: Aug 22, 2014, 08:15 PM IST
धक्कादायक: बलात्काराची शिक्षा, नराधमाला फक्त पाच फटके title=

बिजनौर, उत्तर प्रदेश: १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला एका पंचायतीने पाच वेळा श्रीमुखात लगावण्याची शिक्षा ठोठावली आहे. पंचायतीच्या या निर्णयाचा सर्वस्तरातून विरोध होत असून प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त झळकल्यावर पोलिसांना जाग आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

बिजनौर जिल्ह्यातील चांडक या गावात राहणाऱ्या १४ वर्षाच्या मुलीवर गावातील तरुणानं बलात्कार केला. तसंच या घटनेची वाच्यता केल्यास ठार मारु अशी धमकीही दिली. बुधवारी नराधम तरुणानं पुन्हा एकदा पीडित मुलीला गाठलं आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार असह्य झाल्यानं पीडित मुलीनं कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पिडीत मुलगी आणि तिचे आईवडील तक्रार करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात गेले. हा प्रकार गावातील पंचायतीच्या सदस्यांना समजला. त्यांनीही पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल करु नये यासाठी दबाव टाकला. पोलिसांनीही पीडित मुलीच्या कुटुंबीयांना पंचयातीमध्ये सामोपचारानं तोडगा काढा, असं सांगत तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. 

गुरुवारी गावातील पंचायतीनं नराधम तरुणाविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल न करता पीडित मुलीनं त्याला पाच वेळा श्रीमुखात मारावं अशी शिक्षा द्यायला सांगितलं. पोलिसांकडे तक्रार केल्यास मुलीच्या कुटुंबावर बहिष्कार टाकू अशी धमकीच पंचायतीनं दिल्यानं मुलीनं नराधमाला पाच वेळा मारुन प्रकरण मिटवलं. पीडित मुलगी ही गरिब शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलगी असून नराधम तरुण हा गावातील श्रीमंत व्यक्तीचा मुलगा आहे. 

दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांकडून या घटनेचा अहवाल मागवला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.