10

डेल स्टेनने बनविला अनोखा विक्रम

 आशियातील क्रिकेट पिचवर फिरकी गोलंदाजांचा बोलबाला असतो, पण दक्षिण आफ्रिकेचा जलद गती गोलंदाज डेल स्टेन एक अनोखा रेकॉर्ड केला आहे. स्टेन एशियामध्ये सर्वाधिक विकेट घेणारा परदेशी गोलंदाज ठरला आहे. स्टेनच्या नावावर १६ सामन्यात ८० विकेट घेतल्या आहेत. 

बंगळुरू- आरोपीच्या लॅपटॉपमध्ये विद्यार्थिनींचे अश्लिल व्हिडिओ

एका स्थानिक पब्लिक स्कूलमध्ये सहा वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्या प्रकरणी बिहारच्या एका स्केटिंग प्रशिक्षकाला पोलिसांनी अटक केलीय. ही घटना समोर आल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी ही अटक झालेली आहे. या प्रकरणामुळं बंगळुरूत प्रचंड रोष आहे. नागरिक रस्त्यावर उतरलेत. तर आरोपीच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये विद्यार्थिनींचे अश्लील फोटो पोलिसांना सापडलेत. 

MH-17 विमान अपघात : रशिया समर्थक बंडखोर जबाबदार- ओबामा

मलेशिया एअरलाईन्सचे MH-17 हे बोइंग प्रवासी विमान क्षेपणास्त्राने पाडणाऱ्या रशिया समर्थक बंडखोर जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केला आहे. युक्रेनमधील बंडखोरांना रशियाचा पाठिंबा असल्याचे, ओबामा म्हणालेत.

महिला क्रिकेटपटूची अॅसिड पिऊन आत्महत्या

 पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघातील लैंगिक छळामुळे एका तरूण क्रिकेटपटूने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हलिमा रफिक असे 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूचे नाव आहे. तिने प्रचंड डिप्रेशनमुळे अॅसिड पिऊन आत्महत्या केली. पाक क्रिकेट प्रशासनातील एका व्यक्तीवर लैंगिक छळ केल्याचा आरोप तिने केला होता. त्या व्यक्तीने हे प्रकरण कोर्टात नेल्यानंतर हलिमा डिप्रेशनमध्ये गेली.

मलेशियन विमानातल्या 295 प्रवाशांचा मृत्यू

मलेशियन एअरलाईन्सचे MH-17 हे विमान युक्रेनमध्ये बक क्षेपणास्त्राच्या साह्यानं पाडण्यात आलंय.या क्षेपणास्त्र हल्ल्यात विमानातल्या सर्व 295 प्रवाशांचा मृत्यू झालाय. 

पाकिस्तान सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, १ भारतीय जवान शहीद

जम्मू - काश्मीर इथल्या सीमा रेषेवर पाकिस्तान सैन्यानं शस्त्रसंधींचं उल्लंघन करत बुधवारी दुपारी भारतीय सैन्याच्या चौकींवर गोळीबार केला. या गोळीबारात एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत. 

दहशतवाद जगाची मुख्य समस्या, समझोता नको - मोदी

दहशतवाद ही जगातल्या सर्व राष्ट्राला भेडसवणारी मुख्य समस्या असून याबाबत कोणताही समझोता करण्यात येऊ नये असं ठाम मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय.

धोनीची कॅप्टनसी काढून घ्यायला हवी- चॅपेल

'टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा उमेदीचा काळ संपलाय. तो आता टेस्ट क्रिकेटचं नेतृत्व करण्याच्या कामाचा नाही. त्यामुळं भारताच्या कसोटी संघाची सूत्रं त्याच्याकडून काढून ती विराट कोहलीकडं द्यायला हवीत. ती वेळ आली आहे,' असं सडेतोड मत ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन इयान चॅपेल यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळं भारतीय क्रिकेटमध्ये नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

चॅपेल यांच्या मतानुसार, 'वन डे आणि टी-20 मॅचेससाठी धोनी ठीक आहे. पण टेस्टचा कॅप्टन म्हणून त्याची उपयुक्तता संपलीय. संघाला प्रोत्साहन देण्यात तो कमी पडतोय. त्यामुळं आता कोहलीला ही जबाबदारी देणं योग्य होईल.'

आयसीसी वन-डे रँकिंगमध्ये कोहली दुसऱ्या स्थानावर

टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीचं वन-डे रँकिंगमध्ये दुसरं स्थान कायम आहे. कोहलीच्या बॅटची जादू क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये चालते. मात्र, गेल्या काही काळ्यात त्यानं आपल्या बॅटिंगनं वन-डे 

यंदा ‘फिफा’ वर्ल्डकपमध्ये चमकले गोलकिपर!

2014च्या फुटबॉल वर्ल्ड कप हे गोलींचं होतं असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही. प्रत्येक टीम्समधील गोलकिपरनी आपली वेगळी छाप या वर्ल्ड कपमध्ये सोडली. मात्र, या वर्ल्ड कपचा सर्वोत्तम गोली ठरला तो जर्मनीचा गोलकिप मॅन्यूएल नोया.